बाजार समितीने नियमानुसार धना मेथीचा कडता कापण्याबाबत योग्य नियोजन करावे – योगेश तोडकर

पिंपळवंडी -( दि ३) विशेष प्रतिनिधी

जुन्नर क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात धना व मेथी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा कडता कपात करताना कमी जास्त प्रमाणात केला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करवा लागत असून बाजारसमितीने नियमानुसार कडता कापण्याबाबत योग्य नियोजन करावे अशी मागणी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे यूवा आघाडीचे अध्यक्ष योगेश तोडकर यांनी केली आहे
जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते या पत्रकार परिषदेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे जिल्हा संघटक आंबादास हांडे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ उपाध्यक्ष अजित वाघ यूवा आघाडीचे अध्यक्ष योगेश तोडकर सचिव संभाजी पोखरकर अजितनाना वालझाडे आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की शेतकरी शेतकरी दिवसभर शेतात मेहनत करतो व तो आपली मेथी धना अथवा भाजीपाला घेऊन जुन्नर क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात येतो तेंव्हा व्यापारी शेतकऱ्यांना भाजीच्या जुड्या लहान मोठ्या आहेत असे सांगून शेकडा वीस ते तीस जुड्यांची कपात करतो त्यामुळे त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतकऱ्यांनी जेव्हढ्या जुड्या बाजारात आणल्या आहेत तेव्हढ्याच जुड्या मांडल्या गेल्या पाहिजेत व त्यानंतर बाजार समितीच्या नियमानुसारच कडता कापला पाहिजे त्याबाबत बाजार समितीने फलक लावणे आवश्य आहे याबाबत बाजार समितीने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे अशी मागणी तोडकर यांनी केली आहे

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close