बजरंगदल नारायणगाव यांच्या वतीने वंचीतांना दिवाळी फराळ वाटप

नारायणगाव -: ( दि ३) दताञय जाधव

बजरंग दल नारायणगाव च्या वतीने धामणखेल येथिल नंदनवन मधिल मंतीमंद मुलाना व पांगरी माथा येथिल राजाराम पाटील जेस्ट नागरिक वृध्दाश्रम तील नागरिकाना व हिवरे व पाटेखैरे मळा येथिल ऊस तोड कामगाराना दिवाळीच्या फराळे वाटप करण्यात आल्याची माहीती सामाजिक कार्यकर्त श्री नामदेव आण्णा खैरे यांनी दिली

या वेळी दताञय जाधव श्री कृष्षा शेलार सर श्री सागर खैरे मयुर खेरे बबलु साळवे सतिश बाबळे बाळु बाबळे रोहीदास भोंडवे अमोल खैरे संदिप पाटे गणेश पाटे अमित खैरे प्रशांत खैरे अनिल शिदें आदी मान्यंवर उपस्थित होते
या वेळी माहीती देताना श्री नामदेव आण्णा खैरे म्हणाले कि जे साखर कारखाना साठी ऊस तोडीनी करतात त्या ऊस तोड कामगाराना दिवाळी करणे त्याच्या झोपडया मध्ये शक्य नसते दिवाळी करण्यासाठी लागणारे साहित्य घेणे अवघड असते

तसेच अनेक ऊस तोड कामगाराच्या झोपडया मध्ये लाईट ची व्यवस्था नाही या सर्व परिस्थिती पाह्रुन प्रथम ऊस तोड कामगाराना फराळ वाटप करण्याचा विचार मनात आला तो विचार कार्यकरत्यांना सांगितला व कार्यकरत्याच्या मदतीने या फराळाचे वाटप करण्यात आले या मध्ये धामणखेल येथिल नंदनवन मधिल मतीमंद मुलाना व राजाराम पाटील जेस्ट नागरिक वृध्दाश्रम केद्रांतील नागरिकाना त्यांच्या संचालका समवेत फराळ वाटप करण्यात आले

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close