महावितरण कंपणीने शेतकऱ्यांची छळवणूक थांबवावी अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू – अजित वाघ

पिंपळवंडी -( दि २) विशेष प्रतिनिधी

महावितरण कंपणीकडून शेतकऱ्यांची छळवणूक केली जात आहे महावितरण कंपणीने ही छळवणूक थांबवावी अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरण कंपणीच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित वाघ यांनी दिला आहे

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी ते बोलत होते या प्रसंगी जिल्हा संघटक आंबादास हांडे
जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ उपाध्यक्ष अजित वाघ यूवा आघाडीचे अध्यक्ष योगेश तोडकर सचिव संभाजी पोखरकर अजितनाना वालझाडे आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की जर एखादा ट्रान्सफॉर्मर जळाला तर त्याबाबत महावितरण कंपणीच्या वरीष्ठ कार्यालयास कळवावे लागते मात्र त्याबाबत कळविले जात नाही ट्रान्स्फफार्मरची मागणी केली तर पंधरा दिवस ते एक महिना तो दिला जात नाही ट्रान्सफार्मर तयार व्हायचा आहे अशी उत्तरे दिली जातात त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांची पिके करपून जातात व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते ही नुकसानभरपाई ना महाविरतण कंपणीकडून मिळते ना शासनाकडून फ्यूज गेला केबल जळाली तार तुटली तरी शेतकऱ्यांकडून पैसे जमा करुन काम केले जाते महावितरण कंपणीकडून शेतकऱ्यांची छळवणूक केली जात असून महावितरण कंपणीने आपला कारभार त्वरित सुधरावावा अन्यथा शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल महावितरण कंपणीच्या कार्यालयास टाळे ठोकू असा इशारा शेतकरी संघटनेच्यावतीने अजित वाघ यांनी दिला आहे

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close