पिंपळवंडी बसस्टँड येथील गतिरोधक काढल्यामुळे अपघात होण्याची शक्यता : पुन्हा गतीरोधक टाकण्याची ग्रामस्थांनी केली मागणी
पिंपळवंडी -( दि २) प्रतिनिधी

पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी बसस्टँड या ठिकाणी असलेल्या उतारावर असलेला गतीरोधक काढून टाकण्यात आल्यामूळे या ठिकाणी अपघात होण्याचा संभव असून या ठिकाणी पुन्हा गतिरोधक टाकण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे
पुणे नाशिक महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वहातुकीची वर्दळ असते या ठिकाणी कुकडी डाव्या कालव्यापासून तर कुकडी नदीच्या पुलापर्यंत तिव्र प्रकारचा उतार आहे तसेच या ठिकाणी पुणे नाशिक या महामार्गाला जोडणारा पिंपळवंडी व भटकळवाडी रस्ता आहे या ठिकाणी असलेल्या चौकातून दोन्हीही बाजूला जाणारे नागरिक रस्ता पार करत असतात त्यामुळे या ठिकाणी अपघात होऊ नये व नागरिकांना रस्ता पार करताना सोयीचे व्हावे म्हणून पुणे नाशिक महामार्गवर असलेल्या उताराच्या मध्यभागी गतीरोधक टाकण्यात आला होता परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा गतीरोधक टाकून टाकल्यामुळे वहानांच्या वेगाला मर्यादा राहिलेली नाही त्यामुळे पिंपळवंडी भटकळवाडी व इतर ठिकाणाहून येणारे नागरिक व शालेय विद्यार्थी यांना रस्ता पार करता येत नाही आळेफाटा बाजूकडून येणाऱ्या वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याचा संभव आहे त्यामूळे या ठिकाणी पुन्हा गतीरोधक टाकण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल रासकर सतिष काकडे वैशाली काकडे ग्रामस्थ योगेशभाऊ काकडे संतोष गोडसे सुभाष अभंग लक्ष्मण ताजणे सुहास रायकर जालींदर बनकर दादाभाऊ घोलप किशोर बनकर बाळासाहेब काकडे दिलीप काकडे यांनी केली आहे