नारायणगाव पोलिसांनी केली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या विश्वनाथ लॉजवर कारवाई : तिघाजणांवर केला गुन्हा दाखल

नारायणगाव -( दि २) विशेष प्रतिनिधी

नारायणगाव ( ता जुन्नर) येथे वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या नारायणगाव येथील विश्वनाथ लाॅजवर नारायणगाव पोलिसांनी छापा टाकला या प्रकरणी तिघाजणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई बुधवारी ( दि २) करण्यात आली
याबाबत सविस्तर माहिती अशी की नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डि के गुंड यांना गुप्त माहिती दारा मार्फत बातमी मिळाली की विश्वनाथ लॉज एस.टी. स्टॅन्ड समोर नारायणगाव तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, येथे लॉज चालक १) अशोक हृदयनारायण तिवारी २) गौरव अशोक तिवारी हे इसम कैलास नामदेव वाबळे यांच्या मदतीने सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय चालवून स्वतःची उपजिविका करत आहे सदर बातमीची दखल घेत सपोनि डि के गुंड यांनी सदर बातमीचा आशय माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे सो यांना कळविला सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जवळे सो यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन येथे हजर राहून सदर छापा कारवाईसाठी पोलीस स्टाफ, पंच व बनावट गिराईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून छापा कारवाई साठी रवाना केले सदर ठिकाणी बनावट गिऱ्हाईक यांनी जाऊन वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली त्याप्रमाणे कैलास वाबळे यांनी वेश्या गमनासाठी महिला पुरवून त्यांचेकडून विश्वनाथ लॉज चे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यांनी एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली लागलीच माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी सो मंदार जावळे यांनी व पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणारी पीडित दोन महिला यांना ताब्यात घेऊन लॉजचे चालक अशोक तिवारी , गौरव तिवारी यांना ताब्यात घेतले आहे आहे. सदर आरोपी नामे १) अशोक हृदयनारायण तिवारी २) गौरव अशोक तिवारी रा. विश्वनाथ लॉज नारायणगाव ता जुन्नर जि. पुणे ३) कैलास नामदेव वाबळे रा वडगाव सहाणी ता. जुन्नर जि. पुणे यांच्या विरूध्द पो.कॉ. योगेश दामोदर गारगोटे यांनी फिर्याद दिली असून पिटा व प्रचलीत कायदयान्वये पुढील अधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक श्री.डॉ अभिनव देशमुख साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री विवेक पाटील सो, यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मंदार जावळे सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक हिंगे, व नारायणगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारायणगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी के गुंड हे करीत आहेत

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close