शेतक-यांना एफ आर पी ची रक्कम तात्काळ जमा करा अन्यथा तिव्र प्रकारचे आंदोलन करु : जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचा इशारा

नारायणगाव -( दि २) विशेष प्रतिनिधी

कारखाने सुरु होऊन दीड महिना झाला आहे मात्र अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी ची रक्कम मिळाली नाही त्यामूळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर एफ आर पी ची रक्कम देण्यात यावी अशी मागणी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून ही रक्कम तात्काळ जमा न झाल्यास संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करु असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शेतकरी संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक आंबादास हांडे यांनी मागणी केली या वेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे तालुका अध्यक्ष संजय भुजबळ उपाध्यक्ष अजित वाघ यूवा आघाडीचे अध्यक्ष योगेश तोडकर सचिव संभाजी पोखरकर अजितनाना वालझाडे आदी उपस्थित होते
याबाबत बोलताना हांडे म्हणाले की ऊस तोडणीनंतर चौदा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा नियम आहे असे असतानाही दिड महिना झाला तरी केंद्रसरकारने जाहिर केलेली एफ आर पी ची रक्कम अद्यापही शेतक-यांच्या खात्यावर रक्कम अदा केलेली नाही त्यामुळे ज्या कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत त्या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे ज्या कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर जमा केले नाहीत त्यांनी पाच तारखेच्या आत रक्कम व्याजासह जमा करावी अन्यथा ज्या शेतकऱ्यांनी संचालकांना निवडून दिले आहे त्या संचालकांना याबाबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जाब विचारणार आहेत आणि त्याची सुरवात ही जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यापासून करणार असल्याचे आंबादास हांडे यांनी सांगितले

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close