दोन लाखाच्या रकमेसह दोन साड्यांची लाच स्वीकारनारा सहकारी अधिकाऱी व त्याचा मुलगा लाचलुचपतच्या जाळ्यात

मुंबई - ( दि ३०) संतोष पडवळ

सोसायटीचा सिकिंग फंड वापरण्यासाठी अर्जावर परवानगी मिळावी म्हणून दोन लाख रुपयांसह दोन साड्यांची लाच घेणारा सहकारी अधिकारी व त्याचा मुलगा यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले
याबाबत माहिती अशी की रोलेक्स अपार्टमेंट को आँप सोसायटी एस व्ही रोड न्यू एरा सिग्नलजवळ मालाड ( पश्चिम) मुंबई या सोसायटीचे चेअरमन यांनी इमारतीच्या दुरूस्तीसाठी सोसायटीचा सिकिंग फंड वापरण्यासाठी म्हणून सोसायटी मार्फत उपनिबंधक सहकारी संस्था पी विभाग ठाकूर काँम्पेले्क्स कांदीवली ( पूर्व) मुंबई ६८ यांना लेखी अर्ज केला होता याबाबत परवानगी घेण्याकरिता श्रेणी एकचे सहकार अधिकारी भरत महादू काकड वय ५७ वर्ष दोन लाख रुपये व दोन साड्यांची मागणी केली होती ही मागणी मान्य न झाल्याने काकड यांनी सोसायटीचे सेक्रेटरी यांना डीफाॅल्टर ठरवून कमिटी बरखास्त करण्याची नोटीस बजावली त्यावर फिर्यादी यांनी पुन्हा लोकसेवक काकड यांच्याशी संपर्क करुन काकड यांनी पुन्हा दोन लाख रुपये व दोन साड्यांची मागणी केली परंतु फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने पडताळणी करुन सापळा लावला या सापळ्यात भरत काकड यास दोन लाख रूपयांची लाच घेताना तर त्यांचा मुलगा सचिन भरत काकड यास दोन साड्या घेताना रंगेहात पकडण्यात आले त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close