महात्मा फुलेंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी : डॉ. अनिल पाटील

बेल्हे -( दि २९) विशेष प्रतिनिधी

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पुष्पहार व फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.वैभव आहेर,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,सर्व विभागप्रमुख उपस्थित होते

महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि,अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र” असे म्हणतात.
जोतिबांचे पूर्वज पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत, त्यामुळे त्यांचे आडनाव फुले असे पडले.
‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय.तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती.त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले.
संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले कि,आजही महात्मा फुले यांची ग्रंथसंपदा समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे.समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे.
महात्मा फुलेंचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे चे मत डॉ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले.
सर्व उपस्थितांचे आभार प्रा.राजीव सावंत यांनी मानले.

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close