समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी : उतक्रुष्ट निकालाची परंपरा कायम
बेल्हे -( दि २२) विजय चाळक

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी (ता जुन्नर)
संचलित समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे(बांगरवाडी) या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला असून महाविद्यालयाने उतक्रुष्ट निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२० चे निकाल नुकतेच जाहीर झाले.त्यात समर्थ च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत संस्थेच्या यशस्वी वाटचालीत मोलाची भर घातली आहे.शाखानिहाय निकाल पुढील प्रमाणे
तृतीय वर्ष कॉम्पुटर इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
साक्षी शिंदे-९८.९४ %
द्वितीय क्रमांक:
साक्षी जाधव- ९८.५९ %
तृतीय क्रमांक:
आरती गवांदे-९८.३५ %
तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
नाजेरा इनामदार-९७.४७ %
शिवानी गुंड-९७.४७ %
द्वितीय क्रमांक:
पूनम टेमगिरे-९७.२० %
तृतीय क्रमांक:
निकिता फापाळे-९६.१३ %
तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
विजय फुटाणे-९७.३ %
द्वितीय क्रमांक:
आकाश विश्वे-९६.३ %
तृतीय क्रमांक:
मच्छिन्द्र बढे-९६.२ %
तृतीय वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंग
प्रथम क्रमांक:
आदेश औटी-९८.३३ %
द्वितीय क्रमांक:
कांचन फराटे-९७.६७ %
तृतीय क्रमांक:
शिवाजी कुठे-९७.६७ %
तृतीय वर्षातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधील १८ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण,सिव्हील इंजिनिअरिंग मधील२० विद्यार्थ्यांना,मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधील ७ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील २ विद्यार्थ्यांना विविध विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले असून ९० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे प्रा.संजय कंधारे यांनी सांगितले
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,विभागप्रमुख व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले आहे.