सम्रुद्ध गाव योजनेअंतर्गत लोणी व परिसरातील शिवार फेरी

मंचर -( दि २१) समीर गोरडे

तहसीलदार तथा कार्यक्रम अधिकारी,आंबेगाव यांचे निर्देशानुसार समृद्ध गांव योजने अंतर्गत गुरूवारी ( दि १९) गाव परिसरात “शिवार फेरी” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . श्रीमती डोके (APO) मंडल अधिकारी खोमणे कामगार तलाठी
श्री मुंगळे कृषी विभागाचे घुले, श्रीमती शेळके, सार्वजनीक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता लोंढे वन विभागाचे वनपाल नारायण महादेव अहिर सामाजिक वनीकरण विभागाचे यासिन सैय्यद अंगणवाडी सेविका शशिकला जोशी शैलजा क्षीरसागर मनीषा पडवळ अलका खंडागळे, संदीप आढाव ( पोलीस पाटील, लोणी) रोजगार सेवक श्री अंकुश लंके इ विविध विभागाचे अधिकारी प्रतिनिधी हजर होते.
श्रीमती उर्मिलाताई धुमाळ (सरपंच,ग्रा. प.लोणी) , माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी चे श्री श्री उदयसिंह वाळुंज ( अध्यक्ष), श्री प्रकाश सोनवणे (से.नि. उप संचालक कृषी), श्री राहुल सोनवणे (सहा. आयुक्त विक्रीकर विभाग) , श्री प्रकाश वाळुंज (Rtd PSI), श्री अनिल सोपान पंचरास ( ग्रा प स), श्री रवींद्र रोकडे (ग्रा प.स.), ग्रामस्थ श्री उद्धव राव लंके ( माजी सरपंच), श्री दिलीपशेठ वाळुंज ( माजी सरपंच) श्री संतोष पडवळ, श्री अशोकराव आदक, श्री बाळशीराम वाळुंज,श्री रोहिदास वाळुंज, श्री सतीश थोरात, श्री मधू रोकडे श्री संतोष धुमाळ श्री प्रकाश सिनलकर, श्री अमित वाळुंज, श्री नारायण वाळुंज, श्री बाळासाहेब रंगनाथ वाळुंज, श्री कैलास बबन गायकवाड, श्री उत्तम सोनवणे, श्री हैबतराव आढाव, श्री गुलाब भागवत, श्री नानभाऊ आदक, श्री शिवाजी हरिभाऊ गायकवाड श्री दशरथ गायकवाड, श्री हनुमंत पठाजी वाळुंज , श्री दशरथ गायकवाड , श्री विनोद गायकवाड, श्री वसंत लंके, श्री रवींद्र ब गायकवाड, श्री विठ्ठल घ. गायकवाड, श्री अनिकेत पंचरास व ग्रामस्थ शिवार फेरीसाठी उपस्थित होते .
समृद्ध गाव योजना “शिवार फेरी” सुरू होण्यापूर्वी श्रीमती डोके मॅडम व ग्रामसेवक श्रीमती जाधव यांनी आजचे शिवार फेरीचा उद्देश उपस्थितांना समजावून सांगितला . समृद्ध गाव योजने अंतर्गत येणारी सार्वजनिक कामे, वैयक्तिक लाभाची कामे, योजनेसाठी पात्र लाभार्थी निकष व कामे तसेच मजूर आराखडा, जॉब कार्ड नोंदणीची तपशीलवार माहिती दिली, वैयक्तिक लाभाचे योजनेसाठी पात्र असलेले उर्वरित ग्रामस्थांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज सादर करावेत असे आवाहन ग्रामसेवक श्रीमती जाधव यांनी केले.
शिवार फेरी लोणी गावचे खालचा चौक येथून सुरू होऊन, बाजारपेठ ते महादेव मंदिर, आढाव वस्ती, बाग वस्ती ते डोमाळा थोरात वस्तीचा भाग, ते शेकोबा रोड,
(वणी शिवडी,कुरण, धायदरा, सुतार खोरी, उंबर खोरी, गुरू धुति, रामोसदरा) , शाळे मागील वृक्ष उद्यान,बोरबन, हडकी, मुक्ताई माळ, हाडकी विभाग आंबेडकर नगर, गाव ठाण, कौट कर वस्ती, गलठा वरचा- खालचा ते पाच टोळी विभाग पर्यंत शिवार फेरी करण्यात आली, श्रीमती डोके (APO) यांनी समृद्ध गाव योजने साठी करावयाची विकास कामे संबंधात असलेल्या चित्रफितीची माहिती दिली तसेच ती सर्वांचे माहितीसाठी समाज माध्यम ग्रुपवरही पाठविणार असल्याचे सांगितले.
शिवार फेरी दरम्यान खाजगी जमीन जागा, शासकीय गायरान जमिनी , वन विभागाचे हद्दीतील जागांची पाहणी करण्यात आली, कच्चे पक्के बंधारे, नाला खोलीकरण, खाजगी बांध बंदीस्ती, फळबाग लागवडीसाठी उपयुक्त जमीन, जागा, वृक्ष लागवडी ची ठिकाणे तसेच लागवडीसाठी उपलब्द जागा याची पाहणी करण्यात आली.तसेच ग्रामपंचायत मार्फत करण्यात येणारे सार्वजनिक विहिरीची जागा इ ठिकाणी भेट देण्यात आली. त्याच प्रमाणे सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षारोपण होणे शक्य असलेली ठिकाणे पाचटोळी माळरान विभाग पाहणी करण्यात आली. सामाजिक वनीकरण विभागातर्फे पाचटोळी विभागात वृक्ष लागवड, करण्यासाठी तसेच सीसीटी करण्यासाठी माहिती व प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात येईल असे उपस्थित प्रतिनिधी यांनी सांगितले आहे.
वन विभागामार्फत प्रस्तावित कामाचा आराखडा अहवालाची प्रत उपस्थित वनविभाग अधिकारी यांनी ग्रामपंचायत येथे सादर केली आहे. लोणी गावातील अभिलेखा वर नोंद असलेले रस्ते व दुरुस्ती कामे सा बां विभागाकडून करण्यात येतील असे उपस्थित प्रतिनिधीं श्री लोंढे यांनी सांगितले
उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांनी पाहणी केलेले ठिकाणी वन, सामाजिक वनीकरण व कृषी विभागातर्फे करण्यात येणारी कामे एकूण कोणत्या ठिकाणी व किती असावीत याबाबत उपस्थित ग्रामस्थांचे वतीने प्राथमिक स्वरूपाची अंदाजित कामाची यादी श्री प्रकाशराव सोनवणे (सेवानिवृत्त उप संचालक, कृषी) यांनी वाचून दाखवली ती खालील प्रमाणे
1. पक्के सिमेंट बंधारे ….12
2. माती नाला बांध………17
3.नाला खोलीकरण … 15 गट.
4. गॅबियन बांध…….. 11
5. नाडेफ …………….. 100
6.गांडूळ खत…. 100
7. वन तळी …. 11
8. सी सी टी …. 150 हेक्टर
उपस्थित सर्व विभागाचे प्रतिनिधींना या प्राथमिक कामाची यादी अवगत करण्यात आली
गावातील एक सेवाभावी संस्था “माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी,” लोणी यांचेकडून शैक्षणिक कामाबरोबरच इतर लोकोपयोगी कामाचे उपक्रम ही राबविण्यात येतात. या संस्थे तर्फे गावातील विविध सार्वजनिक कामासाठी प्रबोधिनी सदस्य व ग्रामस्थाकडून श्रमदान करण्यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल असे मनोगत अध्यक्ष श्री उदयसिंह वाळुंज यांनी व्यक्त केले .
उपस्थित सर्व विभाचे अधिकारी, प्रतिनिधी तसेच ग्रामस्थांनी चर्चेत सहभागी झाले होते. माजी सरपंच श्री दिलीपशेठ वाळुंज यांनी ग्रामस्थांचे वतीने समृद्ध गाव योजनेसाठी कार्यास सुरुवात झाल्याबद्दल तसेच शिवरफेरी बाबत समाधान व्यक्त केले.
ग्रामसेवक श्रीमती जाधव यांनी शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले

शेअर करा

iamadmin

ताज्या व सविस्तर बातम्या पहाण्यासाठी शिवनेर वार्ता वेब न्यूज पोर्टल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close