राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख पदावर राजेंद्रकुमार शेळके यांची निवड

पुणे -( दि २१) विषेश प्रतिनिधी

नारायणगाव ( ता जुन्नर) येथील राजेंद्रकुमार शेळके यांची राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड झाली आहे

नारायणगाव ( ता जुन्नर) येथील पत्रकार व सध्या नोकरी निमित्त पुण्यात असलेले राजेंद्रकुमार शेळके हे एक उत्तम कवी असून त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहे त्यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची राज्यस्तरीय फेलोशिप मिळाली आहे त्यांची एक कविता जागतिक विश्वविक्रमी काव्यसंग्रहात नोंद झाली असून त्यांना विविध संस्थाचे पुरस्कार मिळालेले आहेत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून त्यांनी अनेकवेळा काव्य सादरीकरण केलेले आहे त्यांचे जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे विघ्नहर कलामंचची स्थापना करुन त्यांनी या माध्यमातून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले आहेत दैनिक केसरी या वर्तमान पत्रामधून सलग एकशे बावीस गुन्हेगारी कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल तात्कालीन राष्ट्रपती डाॅ ए पी जे अब्दुल कलाम यांचे अभिनंदन पर पत्र प्राप्त झालेले आहे
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्ययन आण्णासाहेब कटारे यांनी त्यांची पुणे शहराच्या प्रसिद्धी प्रमुखपदावर नियुक्ती केली आहे त्यांच्या या नियूक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

शेअर करा

iamadmin

ताज्या व सविस्तर बातम्या पहाण्यासाठी शिवनेर वार्ता वेब न्यूज पोर्टल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close