बेलापूर व बोटा परीसरात चिकनगुणीया सदृश्य आजाराची साथ
बेलापूर बदगी -( दि ८) वैभव दादाभाऊ फापाळे

अकोले तालुक्यातील बेलापूर संंगमनेर तालुक्यातील बोटा या परिसरात चिकनगुनिया सदृश्य आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत या परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सांधेदुखी, थंडी- ताप, या आजाराने अनेक नागरिक त्रस्त असून दवाखाने रुग्णांनी भरले आहेत याबाबत आरोग्य खात्याच्या सूत्रांशी संपर्क साधला असता ही लक्षणे चिकनगुनियात असतात परंतु हा आजार चिकनगुनिया नाही या स्पष्टीकरणामुळे हा आजार कोणता असा प्रश्न नागरिकांपुढे पडला आहे डासांच्या प्रादुर्भावामुळे असा आजार होत असल्याचे येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले या परिसरात सध्या डासांचा प्रादुर्भाव असून ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामसेवक मात्र कधीतरीच ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकतात. डास निर्मूलनासाठी अद्याप तरी कोणतीही मोहीम राबवली नाही बेलापूर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र असल्याने येथील सोयींना मर्यादा पडतात मात्र ब्राह्मण वाडा येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या अंतर्गत बेलापूर गाव येत असल्याने ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे बेलापूर येथील रुग्णांनी ब्राह्मणवाडा आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा केंद्र सोडून बाह्यरुग्ण विभाग इतरत्र सुरु करण्यासाठी अडचणी असल्याचे वैद्यकीय अधिकारी बी टी सोनवणे यांनी यावेळी सांगितले