समर्थच्या विद्यार्थ्यांना मिळणार मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीच्या संधी

बेल्हे -( दि ७) विजय चाळक

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथील अभियांत्रिकी,एम बी ए,बी सी एस मधील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्लेसमेंट सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने अनुदिप फाऊंडेशन पुणे यांच्याशी नुकताच एक सामंजस्य करार करण्यात आला.संस्थेचे सचिव विवेक शेळके व अनुदिप फाऊंडेशन च्या संचालिका सौ.सोनाली फुलसुंदर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या करून शिक्कामोर्तब केले.यावेळी समर्थ अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
या डिजिटल युगामध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान व उपक्रमशील प्रयोग संकुलामध्ये सतत चालूच असतात.याचाच एक भाग म्हणून अभियांत्रिकी,एम बी ए व बीसीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनुदिप फाऊंडेशन च्या सहयोगाने प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्रॅम च्या माध्यमातून प्लेसमेंट दिल्या जाणार असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
या प्रोग्रॅम साठी संकुलातील१६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी,ऑनलाईन परीक्षा,संभाषण कौशल्ये,तांत्रिक ज्ञान,मूलभूत संज्ञांचे आकलन याद्वारे पूर्व निवड चाचणी घेण्यात आली.त्यातून ५३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
या सामंजस्य करारांतर्गत कार्पोरेट क्षेत्रामध्ये अत्यंत गरजेचे व महत्वपूर्ण असे डिजिटल मार्केटिंग,डॉट नेट फुल स्टॅक डेव्हलपर,जावा प्रोग्रामिंग इ अद्ययावत अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.याद्वारे विद्यार्थ्यांना कॅपजेमिनी,एकसेंचर,कॉग्नीझंट,मॉर्गन स्टेनले या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती अनुदिप फाऊंडेशन च्या संचालिका सौ.सोनाली फुलसुंदर यांनी दिली.
या प्रोग्रॅम साठी बहुराष्ट्रीय कंपन्यांचा अनुभव असलेल्या जेष्ठ व अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळत आहे.याचा फायदा विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य व कारकीर्द घडवण्यासाठी निश्चितच होणार आहे.
सदर प्लेसमेंट समर्थ संकुलाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागा अंतर्गत होत असून प्रा. भूषण बोऱ्हाडे,डॉ.महेश भास्कर व प्रा.अमोल काळे या प्रोजेक्ट साठी समन्वयक आणि प्लेसमेंट अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

शेअर करा

iamadmin

ताज्या व सविस्तर बातम्या पहाण्यासाठी शिवनेर वार्ता वेब न्यूज पोर्टल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close