भारत संचार निगम लिमीटेड (BSNL) व समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे यांच्यामध्ये सामंजस्य करार

बेल्हे -( दि २०) विजय चाळक

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व भारत संचार निगम लि.पुणे (BSNL) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे च्या वतीने प्राचार्य डॉ.अनिल पाटील व भारत संचार निगम लि पुणे यांच्या वतीने क्षेत्रीय दूरसंचार प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य निलेश वानखेडे,उपमंडल अभियंता प्रा.नितीन बावसकर व राजेश साकळीकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून शिक्कामोर्तब केला.
या करारा अंतर्गत संकुल व परिसरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टेलिकॉम क्षेत्र व त्यातील व्यवस्थापन संदर्भात मोफत वेबिनार,सेमिनार,व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.तसेच टेलिकॉम क्षेत्राशी निगडित कौशल्य विकास त्याचप्रमाणे आधुनिक व मूलभूत अशा प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शनपर अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत.याद्वारे स्वयं रोजगार क्षमता वाढवण्यासाठीचे प्रशिक्षण तसेच इंटर्नशिप प्रोग्रॅम व अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना मदत होणार आहे.शैक्षणिक सहलीद्वारे विद्यार्थ्यांना भारत संचार निगम लि(BSNL) च्या कार्यालयामार्फत चालणाऱ्या कामकाजाचा आढावा व अभ्यास देखील करता येणे शक्य होणार असल्याचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले.
या क्षेत्रीय दूरसंचार प्रशिक्षण केंद्रामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तसेच तत्सम विद्याशाखेबरोबरच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,मेकॅनिकल इंजिनिअरिंग,सिव्हील इंजिनिअरिंग या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना देखील सॉफ्ट स्किल,संभाषण कौशल्ये,व्यक्तिमत्व विकास आदींचे कमी कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहेत.
सदर सर्व अभ्यासक्रम हे संकुलातच उभारण्यात येणाऱ्या क्षेत्रीय दूरसंचार प्रशिक्षण केंद्रामध्ये उपलब्ध होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी केले आहे.

शेअर करा

iamadmin

ताज्या व सविस्तर बातम्या पहाण्यासाठी शिवनेर वार्ता वेब न्यूज पोर्टल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close