जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडीच्या सुपुत्राची Covid-19 वरील प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कौतुकास्पद कामगीरी

पिंपळवंडी -( दि १९) विजय चाळक

जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी ( चाळकवाडी) येथील डाॅ दिनेश जगन्नाथ पायमोडे यांनी Remdesivir’ या Covid-19 वरील प्रभावी ठरलेल्या औषधाच्या संशोधनात कौतुकास्पद कामगीरी केली असून त्यांनी जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

डाॅ दिनेश पायमोडे यांचे प्राथमिक शिक्षण चाळकवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण येथील शिवांजली विद्या निकेतनमध्ये माध्यमिक शिक्षण झाले असून. त्यानंतर त्यांनी आळे येथील बी जे महाविद्यालयात बी एस सी चे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे तर पदव्युत्तर शिक्षण हे त्यांनी पुण्यातील प्रतिष्ठित अशा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात (Post graduation- M.Sc. (Organic chemistry, First class with distinction and 8th Rank in University of Pune) पुर्ण केले आहे पुढे रसायनशास्त्र विषयात त्यांची पुण्यातील ‘National Chemical Laboratory (NCL)’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रयोगशाळेत Ph. D. साठी ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. सि.व्ही. रमना यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती होऊन त्यांनी तेथे यशस्वी रित्या संशोधन केले
व ते विविध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत प्रसिद्ध झाले डॉ. दिनेश जगन्नाथ पायमोडे (पि. एच. डी., रसायनशास्त्र) हे सध्या अमेरिकेतील ‘Medicines For All’ (Virginia Commonwealth University, VA, USA) या औषधनिर्माण शास्रातील प्रतिष्ठित संशोधन संस्थेमध्ये ‘शास्त्रज्ञ’ पदावर कार्यरत आहेत. डॉ. दिनेश यांनी ‘Remdesivir’ या Covid-19 वर प्रभावी ठरलेल्या औषधाच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचे संशोधन केले व ते यशस्वी झाले आहे. त्यांचे हे योगदान, American Chemical Society च्या ‘Organic Letters’ या रसायनशास्रातील प्रसिद्ध नियतकालिकात दि. १५/०९/२०२० रोजी प्रकाशित झाले. या संशोधनाद्वारे जागतिक औषध कंपन्यांना ‘Remdesivir’ या औषधाचे उत्पादन हे कमी वेळात, कमी खर्चात व मोठ्या प्रमाणावर करता येणार आहे. परिणामी आगामी काळात, Remdesivir च्या किमती जागतिक बाजारपेठेत कमी होण्यास मदत होईल व सर्वसामान्य लोकांना ते सहज उपलब्ध होईल. या संशोधनाचा आधार घेऊन, औषधनिर्माण शास्रातील मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या संस्थेशी संपर्क साधला आहे. ह्या संशोधन प्रक्रियेत दिनेश च्या team ला ‘Bill and Melinda Gates Foundation या संस्थेने अर्थसाहाय्य केले त्यांनी केलेल्या या कौतुकास्पद कामगिरीमूळे जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात त्यांनी मानाचा तुरा रोवला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close