⭕ब्रेकिंग न्यूज – आणे माळशेज घाटात दरड कोसळून पोलिस निरीक्षक जखमी

मुरबाड -( दि २०) प्रतिनिधी

नगर कल्याण महामार्गावर सोमवारी (दि २०) सकाळी बोगद्याजवळ दरड कोसळून कारमधील पोलिस निरीक्षक जखमी झाले आहेत व त्यांच्या स्विफ्ट कारबरोबरच इतर वाहनांचेही नुकसान झालेले आहे

नगर कल्याण महामार्गावर असलेल्या आणे माळशेज घाटात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे पावसामुळे दरवर्षीच दरड कोसळत असते यापूर्वी या ठिकाणी दरड कोसळून पिंपळवंडी येथील एका व्यक्तीचा म्रुत्यू झाला होता दरम्यान माळशेज घाटातील बोगद्याजवळ आज सकाळी पुन्हा दरड कोसळली यावेळी परळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक देसले हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून ( एम एच ०५ सी ए २४२३)
जात असताना काही दगड त्याच्या कारवर पडले त्यामध्ये ते जखमी झाले आहेत या घटनेत त्यांच्या स्विफ्ट कारबरोबरच इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टोकावडे पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन महामार्गावर पडलेले दगड मशिनच्या सहाय्याने बाजूला करुन वहातूक सुरळीत केली

आणे माळशेज घाट हा पावसाळ्यात वहातूकीसाठी धोकादायक असून घाटात कायम दरड कोसळत असते त्यामुळे वाहनचालकांनी किमान पावसाळ्याच्या कालावधीमध्ये इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवहान पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे

शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close