जुन्नर तालुक्यात एकाच दिवशी आढळले कोरोनाचे पाच रुग्ण : बोरी बुद्रुक बरोबरच खामुंडीतही चार पाॅझिटिव्ह रुग्ण

आळेफाटा -: ( दि २० ) शिवनेर वार्ता /प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यात शुक्रवारी ( दि.१९) एकाच दिवशी पाच कोरोना पा‌झिटिव्ह रुग्ण आढळून आले असून पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या अडतीसवर गेली आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की जुन्नर तालुक्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असून आठ दिवसांपूर्वीच राजूरी येथे एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण
आढळून आला होता त्यानंतर शुक्रवारी पुन्हा बोरी बुद्रुक या ठिकाणी रुग्ण सापडल्याने बोरी बुद्रुक गावचा परीसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे सदर व्यक्ती ही एप्रिल महिन्यात मुंबईवरुन गावी आली होती सदर व्यक्तीला निमोनियाचा त्रास होत असल्याने १२ जून रोजी पुण्याला हलवले होते त्यानंतर त्यांची दोन वेळा कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती या दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या त्यानंतर पुन्हा तिसरी चाचणी घेतली असता ही चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे सदर व्यक्ती ही पुण्यात उपचार घेत आहे या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आई व पत्नी अशा २ व्यक्तींना लेण्याद्री कोविड सेंटर मध्ये तपासणी साठी दाखल करण्यात आले आहे तर नगर कल्याण महामार्गावर असलेल्या खामुंडी गावातील एका किराणा व्यवसाय करणाऱ्या दुकानदार व त्याच्या कुटुंबातील इतर तिन जणांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आलेली आहे त्यामुळे जुन्नर तालुक्यातील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली असून नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करुन स्वतःची काळजी घ्यावी असे आवहान जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ उमेश गोडे यांनी केले आहे

शेअर करा
Tags

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close