बोरी बुद्रुकमध्ये आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण : जुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या चौतीसवर तर अॅक्टीव्ह रुग्णसंख्येत घट

आळेफाटा -( दि.१९) शिवनेर वार्ता / प्रतिनिधी

बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथील एका बावन्न वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून जुन्नर तालुक्यातील रुग्णांची संख्या चौतीसवर पोहचली असून अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली असून आता ती तिनवर पोहचली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की जुन्नर तालुक्यात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असून आठ दिवसांपूर्वीच राजूरी येथे एक कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडला होता त्यानंतर आज पुन्हा बोरी बुद्रुक या ठिकाणी रुग्ण सापडल्याने बोरी बुद्रुक गावचा परीसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे सदर व्यक्ती ही एप्रिल महिन्यात मुंबईवरुन गावी आली होती सदर व्यक्तीला निमोनियाचा त्रास होत असल्याने १२ जून रोजी पुण्याला हलवले होते त्यानंतर त्यांची दोन वेळा कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती या दोन्हीही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या त्यानंतर पुन्हा तिसरी चाचणी घेतली असता ही चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे सदर व्यक्ती ही पुण्यात उपचार घेत आहे या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आई व पत्नी अशा दोन व्यक्तींना लेण्याद्री कोविड सेंटर मध्ये तपासणी साठी दाखल करण्यात आले आहे अशी माहिती जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर व गावचे तलाठी राजू बडे यांनी दिली.

शेअर करा
Tags

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close