डाॅ श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून करोनाच्या मुकाबल्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाला ३६ कोटींचा अतिरिक्त निधी -डाॅ शिंदे यांनी मुख्यमंत्री ठाकरे व पालकमंत्री शिंदे यांचे मानले आभार  

ठाणे -: ( दि.१७) संतोष पडवळ

करोना साथीच्या मुकाबल्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात आवश्यक ती आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून १० कोटी रुपयांचा, तर नगरविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून २६ कोटी, असा एकूण ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

महसूल विभागाच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली महापालिकेला १० कोटी, तर नगरविकास विभागामार्फत ठाणे ४.९६ कोटी, उल्हासनगर ७ कोटी, कल्याण-डोंबिवली ७ कोटी व अंबरनाथ ७ कोटी असा २५.९६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

ठाण्यासह संपूर्ण एमएमआर परिसरात करोना साथीला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून आरोग्यव्यवस्था बळकट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनर या महापालिका/नगरपालिकांना पुरेसे आर्थिक पाठबळ देण्याची मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यानुसार महसूल विभागामार्फत वाढीव निधीला मंजुरी देण्यात आली.

तसेच, श्री. शिंदे यांच्या नगरविकास खात्याच्या मार्फतही निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे करोनाविरोधातील लढ्याला आणखी बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

शेअर करा
Tags

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close