शिस्तप्रिय व्यक्तीमत्व कै.सदाशिव गागरे यांचे निधन

वडगाव आनंद -( दि १ मार्च) प्रतिनिधी
गागरे घराण्यातील अत्यंत ज्येष्ठ असे व्यक्तिमत्व, शिस्तप्रिय आणि कुठल्याही व्यसनाला ज्यांनी आपल्या आयुष्यात कधीही थारा दिला नाही असे.. कै. सदबाबा उर्फ नय तरणा बाबा उर्फ मास्तर म्हणजेच स्व. सदाशिव रामकृष्ण गागरे, वय वर्ष १०२, रा. वाडगाव आनंद, ता. जुन्नर, जी.पुणे यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांची आठवण केवळ त्यांच्या सद्गुनामुळे आणि संस्कारामुळे कायम आपल्या सोबत राहील.. दिवंगत महादुबाबा गागरे जेव्हा व्यापार उदिम करण्याच्या निमित्ताने बाहेरगावी असायचे तेव्हा सद बाबांनी संपूर्ण कुटुंबाची धुरा लीलया पेलण्याचे काम त्यांनी केले.. सह्याद्रीच्या सहवासात राहून काळ्या आई ची आणि मुक्या जनावरांची सेवा करण्याचे भाग्य त्यांना लाभले. स्वर्गीय रामकृष्ण बाबा गागरे यांच्या विचारांचा प्रभाव असलेले सद बाबा यांच्या तोंडून कधीही कोणासाठी अपशब्द निघाल्याचे माझ्या तरी ऐकण्यात नाही. डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा, अंगावर नेहरू, कमरेला धोतर आणि पायात वहाणा असे रुबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे गागरे घराण्याची शान होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.. त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, अनेक संकटांचा सामना करत असताना त्यांच्या वडीलधाऱ्या मंडळी सोबतच मुले आणि नातू यांच्याशी देखील स्नेहाचे संबंध वृद्धिंगत केले. खटल्याचे कुटुंब म्हटले तर भांड्याला भांडे लागतेच परंतु त्यातून सुद्धा एकोपा कसा टिकून ठेवावा आणि एकत्र कुटुंब व्यवस्था ही कशी उत्तम संकल्पना आहे हे सांगत बाबांनी समाजासमोर एक आदर्शच निर्माण केला. १९७२ च्या दुष्काळात आपल्या कुटुंबासोबत आपले शेजारी, नातेवाईक यांच्या कुटुंबात सुद्धा कोणी उपाशी नाही ना.. कोणी आजारी नाही ना.. याची वैयक्तीक पातळीवर दखल घेतली.. अपार कष्ट करून सोन्याचा संसार करत समाजव्यवस्था अंगिकारून अनेकांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या, जंगलातल्या वाघा सोबत राहून वाघाचीच निधडी छाती आणि वाघाचेच काळीज असणाऱ्या व ताठ मानेने जगून आयुष्याची शंभरी पार केलेल्या समाजमान्य सद्गृहस्थ म्हणजेच सद बाबांना भावपूर्ण आदरांजली
शब्दांकन – सत्यवान प्रभाकर गागरे

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close