श्री पिंपळेश्वर कावड सोहळ्याचे पिंपळवंडी येथून भीमाशंकरकडे प्रस्थान

पिंपळवंडी ( दि १४) प्रतिनिधी
श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर पिंपळवंडी ( ता जुन्नर) ते श्री क्षेत्र भीमाशंकर या कावड सोहळ्याचे शनिवारी ( दि १४) श्री क्षेत्र भीमाशंकरकडे प्रस्थान झाले
पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथे महान तपस्वी पिंपलाद ऋषींची समाधी असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात पिंपळेश्वर सेवा समितीच्या वतीने गेल्या आठ वर्षांपासून कावड सोहळ्याची अखंड परंपरा सुरु आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी या कावड सोहळ्याचे शनिवारी सकाळी न ऊ वाजता वाजत गाजत व मोठ्या भक्तिभावाने प्रस्थान झाले या प्रस्थानाच्याप्रारंभी श्री पिंपळेश्वर महादेवांना व पिंपलाद ऋषींच्या समाधीस अभिषेक व पुजा करण्यात आली त्यानंतर जलकुंडाचे पाणीपुजन व महाआरती करण्यात आली त्यानंतर या कावड सोहळ्याचे प्रस्थान झाले हा कावड सोहळा मंगळवारी (दि १७ रोजी श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी पोहचणार असून त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग भीमाशंकर जलाभिषेक महापूजा व कळमजाई मातेस चोळीपातळ अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे या कावड सोहळ्याची सांगता गुरूवारी (दि १९) रोजी ह.भ.प.गणेश महाराज घोडेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने
पिंपळवंडी येथे होणार असल्याची माहिती कावड सोहळ्याचे संस्थापक विकास बाजीराव काकडे यांनी सांगितले
या प्रस्थान प्रसंगी माजी सभापती रघुनाथ लेंडे शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश काकडे पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब नाथा काकडे सत्यवान काकडे सोपान काकडे पिंपळेश्वर सेवा समितीचे अध्यक्ष वसंत वाघ उपाध्यक्ष बाबाजी काकडे कार्याध्यक्ष बाळशिराम काकडे सचिव शांताराम लेंडे खजिनदार अविनाश वाघ सदस्य राकेश पवार श्रीराम निमसे रवींद्र बेल्हेकर गजानन मोढवे नारायण काकडे तुषार वाघ संदीप काकडे रोहन काकडे प्रशांत काकडे तुषार वाघ यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते

 

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close