स्वतःची वाट स्वतःच निर्माण करा:डॉ.मिलिंद कसबे
बेल्हे -( दि १२) प्रतिनिधी
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,बेल्हे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा बहि:शाल व्याख्यानमालेचे आयोजन नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथे करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
दुसऱ्याच्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःची वाट स्वतःच निर्माण करा आणि स्वतःची वाट निर्माण करायची असेल,तर खडतर प्रयत्न करावे लागतात.त्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा संदेश प्रसिद्ध वक्ते डॉ.मिलिंद कसबे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संत गाडगेबाबा बहि:शाल व्याख्यानमाला अंतर्गत ‘महापुरुषांना समजून घेताना’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,बीसीएस विभाग प्रमुख प्रा.अमोल काळे,बीबीए बीकॉम विभाग प्रमुख प्रा.गणेश बोरचटे,रासेयो अधिकारी प्रा.दिनेश जाधव परीक्षा विभाग प्रमुख निलेश गावडे बहीशाल कार्यक्रम अधिकारी प्रा.हर्षदा मुळे इतर प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे डॉ.मिलिंद कसबे यांना शाल व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.उत्तम शेलार यांनी सूत्रसंचालन प्रा.अश्विनी हाडवळे यांनी तर आभार प्रा.गणेश बोरचटे यांनी मानले.