आळे येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयाचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न.

आळे -( दि १२) प्रतिनिधी
जुन्नर तालुक्यातील आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव आणि जेव्हा विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर श्रीक्षेत्र आळे संतवाडी कोळवाडी येथील संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर परिसरात संपन्न झाले. “युवकांचा ध्यास, व शहर विकास” या संकल्पनेवर आधारित या शिबिरात सुमारे एकशे पंचवीस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिर काळात विद्यार्थ्यांनी अनेक समाजोपयोगी कार्यांमध्ये सहभाग नोंदवत समाजसेवेचे धडे घडवले. शिबिराच्या पहिल्या दोनच दिवसात या स्वयंसेवकांनी
श्रीज्ञानेश्वर महाराज रेडासमाधी मंदिराच्या सुमारे साडेचार एकर परिसरातील गवत काढून तो प्लास्टिक मुक्त केला. मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांनी आणि दिंड्यांनी याबद्दल विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पुढील दिवशी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी संतवाडी येथील अंगणवाडी आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचा परिसर देखील स्वच्छ करून कचरामुक्त केला. सोबतच संतवाडी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याभोवतीचा परिसर गवत काढून स्वच्छ करत पुतळ्याला जलाभिषेक देखील केला. चौथ्या दिवशी
आपली सामाजिक बांधिलकी जपत कोळवाडी येथील जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छ करून या स्वयंसेवकांनी कोळवाडी येथे मतदार जागृती रॅलीचे आयोजन केले. या रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सोबतच अखेरच्या दोन दिवसात विद्यार्थ्यांनी संतवाडी व कोळवाडी या गावांमध्ये घरोघरी जाऊन वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नव मतदारांची नोंदणी केली. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने व जुन्नर तालुक्याचे नायब तहसीलदार यांनी केलेल्या आवाहनानुसार स्वयंसेवकांनी वोटर हेल्प ॲपच्या साह्याने पाचशेहून अधिक मतदारांची मतदान कार्ड जोडण्याचे काम देखील केले. उस्फूर्तपणे हजेरी लावत त्यांच्या या उपक्रमाचे दोन्ही गावातील नागरिकांनी मनापासून कौतुक केले.
सामाजिक बांधिलकीचे भान जपत कोळवाडी गावचे दिवंगत ग्रामनेते भगवान बाबा सहाणे यांच्या दशक्रियेच्या कार्यक्रमात एक हजारहून अधिक लोकांना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जेवण वाढण्याचे काम देखील या विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या या शिस्तबद्ध कामाचे सर्वत्र कौतुक झाले.

या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी विविध विषयांतील तज्ञ व व्यासंगी व्याख्यात्यांची व्याख्याने देखील आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलीस महानिरीक्षक व आळेगावचे सुपुत्र डॉ. दिलीप भुजबळ यांचे करियर विषयक मार्गदर्शन, संपूर्ण राज्यात हेलिकॉप्टर सरपंच म्हणून प्रख्यात असलेले आंबी दुमालाचे कर्तबगार सरपंच जालिंदर गागरे यांचे ग्रामविकासाचे तंत्र आणि मंत्र या विषयावरील व्याख्यान, डॉ. रसूल जमादार यांचे ग्रामविकासात युवकांची भूमिका, डॉ. रश्मीताई घोलप यांचे आपली जीवनशैली आपले आरोग्य, जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध दुर्ग संशोधक विनायक खोत यांचे जुन्नर तालुक्यातील दुर्ग आणि दुर्ग संवर्धन, ह. भ. प. प्रवीण कुऱ्हाडे यांचे नैतिक मूल्य आणि तरुणाई, पोलीस उपनिरीक्षक खडके यांचे सायबर गुन्हेगारी अशा विविध विषयांवर व्याख्याने झाली. या सर्व व्याख्यानांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिर काळात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध जादूगार प्रकाश शिरोळे यांचे अंधश्रद्धानिर्मूलन विषयक जादूचे प्रयोग विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आले होते. तसेच कोरोना विषयक पथनाट्य विद्यार्थिनींनी सादर केले यालाही ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे येथील श्री संत सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर येथील ओव्यांचा अर्थ समजावून सांगितला. याद्वारे विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा परिचय करून दिला गेला. याखेरीज सात दिवस विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ लिव्हिंग चे योग प्रशिक्षक डॉ. अरुण गुळवे यांनी योगा आणि प्राणायाम चे प्रशिक्षण दिले.

या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उप निरीक्षक श्री. सुनील बडगुजर यांच्या शुभहस्ते व ज्ञानराज ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष नेताजीदादा डोके, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धनंजयशेठ काळे, आळे गावचे सरपंच प्रीतम काळे, संतवाडीचे सरपंच नवनाथ निमसे, कोळवाडी गावच्या सरपंच आतिषाताई गोरक्ष कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष श्री.भाऊदादा कुऱ्हाडे, उपाध्यक्ष श्री.उल्हास सहाणे, झाले, मानद सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अर्जुनशेठ पाडेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संपतशेठ गुंजाळ, संचालक जी. एल. गुंजाळ सर, माऊलीशेठ कुऱ्हाडे, किशोर शेठ कुऱ्हाडे, प्रसन्न अण्णा डोके, अरुणशेठ हुलवळे, राजेंद्र कुऱ्हाडे, तुकाराम दादा गाढवे, दैनिक सकाळचे पत्रकार राजेश कणसे, दैनिक लोकमतचे पत्रकार गोकुळ कुरकुटे, प्रभातचे वार्ताहर मनीष गडगे, पुण्यनगरीचे वार्ताहर गोपीनाथ शिंदे, हिंदवी न्यूज चैनल चे संपादक केदार बारोळे व सहदेव पाडेकर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव व उपप्राचार्य प्रा.संजय वाकचौरे यांच्या उपस्थितीत झाले.
या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्री.शरदराव लेंडे व पंचायत समिती जुन्नरचे सदस्य श्री. जीवन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आळेगावचे उपसरपंच एडवोकेट विजय कुऱ्हाडे, कोळवाडी गावचे उपसरपंच श्री. दिनेश सहाणे व संतवाडी गावच्या उपसरपंच सौ.स्मिताताई पाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
यावेळी शिबिरार्थींनी आपले मनोगत व्यक्त करत या श्रमसंस्कार शिबिराचा सर्व विद्यार्थ्यांना खूप फायदा झाल्याचे सांगितले.
या शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.जयसिंग गाडेकर,प्रा. मनिषा गिरी,प्रा विकास पुंडे, प्रा.डॉ.अर्चना गुंजाळ, प्रा.अरविंद कुटे, प्रा. छाया औटी, प्रा.सोनाली लोणकर,प्रा.शुभांगी भोसले, प्रा.निकिता गाढवे,प्रा.रेश्मा शेख,प्रा.भाग्यश्री बाम्हणे, शुभम गुंजाळ,राजू पाडेकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरविंद कुटे यांनी केले तर आभार प्रा.विकास पुंडे यांनी मांडले

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close