आळे येथे दिवंगत लक्ष्मण तबाजी कु-हाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भाऊदादा कुहाडे युवा प्रतिष्ठानचे वतीने ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळच्या सभासदांना ऊबदार स्वेटर वाटप

आळेफाटा:( दि १२) प्रतिनिधी
आळे (ता जुन्नर) येथील दिवंगत लक्ष्मण तबाजी कु-हाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भाऊदादा कुहाडे युवा प्रतिष्ठानचे वतीने ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळच्या सभासदांना ऊबदार स्वेटर वाटप करण्यात आले.
आळे येथील सामाजिक व वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व लक्ष्मीबाबा कु-हाडे यांचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले. त्यांचे कुटुंबीयांकडुन ठाणे जिल्हा बॅक संचालक भाऊदादा कु-हाडे, संतोष कु-हाडे व भाऊदादा कु-हाडे युवा प्रतिष्ठान यांनी आळे, संतवाडी व कोळवाडी येथील मंदिरांना देणगी व भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्यात आले.
आज बाळकृष्ण महाराज कुऱ्हाडे व वारकरी संप्रदायातील ठकु कु-हाडे, बाळशिराम डावखर, म्हतारबा पिंगळे, सदाशिव सहाणे, पांडुरंग गाढवे, किसन कु-हाडे, बबन कु-हाडे, शिवाजी कु-हाडे, पोपट वाघोले, बाजीराव निमसे, बबन गाढवे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ उपाध्यक्ष उल्हास सहाणे सचिव बाळासाहेब गुंजाळ खजिनदार रोहिदास पाडेकर विनोद शेळके विशाल कु-हाडे गंगाराम कु-हाडे गणेश कु-हाडे, शिवाजी कु-हाडे, गेणभाऊ हुलवळे; भाऊ हुलवळे; परशुराम कु-हाडे, दौलत हुवलळे, म्हतुजी हुलवळे, अशोक जटार, किसन हुलवळे, भास्कर पाडेकर, रवींद्र डावखर, अविनाश कु-हाडे यांचे उपस्थितीत ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ या शैक्षणिक संकुलाचे सभासदांना या ऊबदार अशा स्वेटर वाटपास सुरवात झाली.