समर्थच्या विद्यार्थ्यांचे सांघिक व मैदानी स्पर्धेत यश

आंतरविभागीय खो-खो स्पर्धेत समर्थ पॉलिटेक्निकमधील मुलींचा संघ विजयी
बेल्हे -( दि १५) प्रतिनिधी
श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद येथे आंतर विभागीय (W4) मैदानी क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.त्यामध्ये समर्थ पॉलिटेक्निक,बेल्हे(बांगरवाडी) या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी खो-खो या सांघिक क्रीडा प्रकारामध्ये बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
तसेच नेहा दरेकर हिने २०० मीटर धावणे,१०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला.तर निकिता दरेकर हिने ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशन,इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नववी स्टुडन्ट ऑलम्पिक नॅशनल गेम २०२२-२३ नुकतीच लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी,पंजाब येथे पार पडली.समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील द्वितीय वर्षामध्ये शिकत असलेल्या तन्मय बाबाजी खोकराळे या विद्यार्थ्याने बास्केटबॉल या सांघिक प्रकारातील खेळामध्ये सुवर्णपदक पटकावल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी दिली.
मुंबई संघातून तन्मय ची निवड झाल्याने तसेच उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजयश्री खेचत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सर्वच स्तरातून तन्मय वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक किरण वाघ,डॉ.राजाभाऊ ढोबळे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य डॉ बसवराज हातपक्की,डॉ.संतोष घुले,एच पी नरसुडे,महाराष्ट्र विद्यार्थी ऑलम्पिक असोसिशन चे सचिव प्रा.सुनील सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.