समर्थ औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पदवी प्रदान समारंभ

बेल्हे -( दि ५) प्रतिनिधी
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ औदयोगिक प्रशिक्षण संस्था,बेल्हे (बांगरवाडी) येथे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आय जी डब्ल्यू इंडिया प्रा.लि.,पुणे या नामांकित कंपनीतील प्रॉडक्शन विभागाचे असिस्टंट मॅनेजर रत्नाकर दरेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,एमबीए चे प्राचार्य राजीव सावंत,पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,उपप्राचार्य विष्णू मापारी तसेच सर्व विभागाचे निदेशक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रत्नाकर दरेकर यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आपले अनेक अनुभव विद्यार्थ्यांसमोर कथन केले.औद्योगिक क्षेत्रातील अनेक संकल्पना विविध उदाहरणासह विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या.संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना संस्थेची चालू असलेली वाटचाल आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे नवनवीन उपक्रम याबाबत माहिती दिली.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच प्रथम वर्षांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रमोद गुंजाळ (मोटार मॅकेनिक व्हेइकल),ओम कोंडे (ड्राफ्टमन मॅकेनिक),तेजस जाधव(इलेक्ट्रिशियन),किशोर पादीर (मेक.आर.ए.सी.),ऋषिकेश काळे (फिटर),गणेश कऱ्हे(मेक.डिझेल),ओंकार देवकर (वेल्डर),विजय शिंदे (मेक.ट्रॅक्टर) या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच मार्गदर्शक शिक्षक-निदेशक महेंद्र नाव्ही,विकास कणसे,नबिज शेख,कोंडीभाऊ सहाणे,निकेश औटी,अमोल हाडवळे,राजेंद्र पाचपुते,अनिल शेळके व नंदिनी साबळे यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत औटी यांनी,प्रास्ताविक उपप्राचार्य विष्णू मापारी यांनी तर आभार आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी मानले.