हिंदू-मुस्लिम ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजुरी गाव : पोलीस उपनिरीक्षक सुनील बडगुजर

राजुरी ( ता जुन्नर) येथील शेळके कुटुंबियांतर्फे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ
राजुरी -( दि ३०) प्रतिनिधी
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष वसंतराव शेळके,राजुरी गावचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊली शेठ शेळके,जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ.स्नेहल ताई शेळके व शेळके परिवाराच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव व गावातील सर्व प्रमुख संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.दिवाळी हा मोठा सण असल्याने सर्व मुस्लिम बांधवांना बोलावून दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन त्याचबरोबर प्रमुख मान्यवरांचा सत्कार असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
राजुरी गाव म्हटलं कि,हिंदू-मुस्लीम ऐक्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.इथला समाज म्हणजे हिंदू आणि मुस्लीम यापलीकडे जाऊन माणुसकीचा जिवंत झरा असून हिंदू-मुस्लीम ऐक्याचे मूर्तिमंत व ज्वलंत उदाहरण म्हणजे राजुरी गाव असे उद्गार आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक सुनील बडगुजर यांनी काढले.हिंदू-मुस्लीम याबाबत बोलताना बडगुजर साहेब म्हणाले कि,हिंदू और मुस्लीम मे क्या फर्क है तो एक सपना देखता है और एक ख्वाब.
हा दिवाळी फराळाचा कार्यक्रम म्हणजे खमंग विचारांचा खरपुस नजराणा असून खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिम बांधवांचे पूर्वापारपासूनचे एकोप्याचे दर्शन घडवतो तसेच राजुरी गावच्या जडण-घडणी मध्ये शेळके परिवाराचे महत्वपूर्ण योगदान आहे.जनता,अधिकारी,प्रशासन,समाजबांधव या सर्वांना एकत्रित आणून प्रेमभाव-स्नेहभाव ऋणानुबंध वृद्धिंगत करण्याचे काम या निमित्ताने होते असे मत यावेळी मुस्लीम जमातीचे सदर जाकीर भाई पटेल यांनी व्यक्त केले.
राजुरी या गावाला एक ऐतिहासिक अशी वैचारिक बैठक आहे ती जपण्याचा,जोपासण्याचा आणि प्रचार व प्रसार करण्याचा प्रयत्न हिंदू मुस्लिम या बांधवांना एकत्रित घेऊन या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शेळके कुटुंबियांमार्फत दरवर्षी केला जातो.जुन्या आठवणींना उजाळा देत चालीरीती,परंपरा,संस्कृती यांचे जतन करण्यासाठीच हा कार्यक्रम घेत असल्याचे मुस्लिम माजी सदर रईस भाई चौगुले यांनी सांगितले.
समाजातील सर्वच स्तरातील विशेषतः मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन चालण्याची शेळके परिवाराची भूमिका कौतुकास्पद असल्याचे माजी सदर अकबर भाई पठाण म्हणाले.
यावेळी ऍडव्होकेट सलीमभाई पटेल यांनी मनोगत व्यक्त केले.
आभार व्यक्त करताना वल्लभ शेळके सर म्हणाले कि,मुस्लिम समाजाचे सर्वांशी सलोख्याचे संबंध असून राजुरी गावच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचा मोलाचा वाटा आणि ठसा आहे.
यावेळी समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष वसंतराव शेळके,वल्लभ शेळके,विवेक शेळके,सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे,माजी सदर गणिभाई पटेल,माजी सदर मुस्लिम जमात रईसभाई चौगुले,हाजी अब्दुल्ला पतसंस्थेचे चेअरमन मुबारक तांबोळी,जमातीचे उपाध्यक्ष आबुभाई पठाण,नजीरभाई शेख,महंमद भाई पटेल,संकल्प चे जिलानी पटेल,सलीमभाई पटेल,हसनभाई पटेल,मन्सूरभाई चौगुले,आयुबभाई पटेल,सलीमभाई सय्यद,करीमभाई पटेल,कलीमभाई पटेल,फिरोजभाई पटेल,पप्पूभाई पटेल,अजीमभाई पटेल,जावेदभाई चौगुले,आजीम पटेल,अबूबक्कर चौगुले,जब्बार चौगुले,जब्बार इनामदार,शौकतभाई चौगुले,ताहीर पठाण,गणीभाई चौगुले,वसीमभाई पटेल,जमीरभाई पटेल,डी बी गटकळ साहेब,तंटा मुक्ती अध्यक्ष संदिप शेठ औटी,निलेश शेठ हाडवळे (बंटीशेठ),ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी,सखाराम गाडेकर,गौरव घंगाळे,शाकिर भाई चौगुले,किरण जाधव,मोहन शेठ नायकवाडी,रमेश काका औटी,विविध कार्यकारी सोसायटी चे उपाध्यक्ष अविनाश पाटील औटी,सोसायटी चे संचालक दस्तगीर पठाण,डी बी गटकळ साहेब,हनुमान देवस्थान चे अध्यक्ष मुरलीशेठ पाटिल औटी,डॉ. दिलीप ताजवे,रामदास सरोदे,विलास सरोदे,राजेश कणसे,गंगाराम औटी,प्रदिप गाडेकर,दत्तू नाना कणसे व सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
निलेशशेठ हाडवळे व शकिरभाई चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.