समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ई-पीक नोंदणी

बेल्हे -( दि २५) प्रतिनिधी
शासन निर्देशानुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची मोबाईल द्वारे ई-पीक पाहणी करणे बंधनकारक असून यापुढील सर्व अनुदान किंवा योजनांचा लाभ पीक पाहणी नोंदवली असेल तर मिळणार आहे.गावामध्ये अतिवृष्टीमूळे झालेल्या पीकाच्या पंचनाम्याची नोंदणी करण्यापूर्वी ई-पीक पाहणी नोंदवणे आवश्यक आहे.

राजुरी गावामध्ये ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यासाठी सरपंच,उपसरपंच,सर्व सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय बेल्हे (बांगरवाडी),राष्ट्रीय सेवा योजने च्या विद्यार्थ्यांच्या साहाय्याने ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यात आली.प्रत्येक मळा,शिवार,वाड्या वस्त्या या ठिकाणी ५-५ विद्यार्थ्यांचे गट करून सोबत ग्रामपंचायत कर्मचारी व सदस्य यापैकी जे उपलब्ध असतील त्यांना बरोबर घेऊन आज १०११ शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी व नोंदणी करण्यात आली.
सदर ई-पीक पाहणी व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्याने राजुरी गावातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजना नुकसान भरपाई /शासन अनुदान,सोसायटी कर्ज,बँक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे सरपंच प्रियाताई हाडवळे व उपसरपंच माऊली शेठ शेळके यांनी सांगितले.
सामाजिक भावनेतून समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तुत्य आणि समाजाभिमुख उपक्रमाचे राजुरी ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना तलाठी धनाजी भोसले,राहुल कुमावत,नितीन औटी,सचिन औटी यांनी ई-पीक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी निलेश हाडवळे,किरण जाधव,सुजित बनकर,पांडुरंग औटी,विलास सरोदे,सचिन गटकळ,प्रतीक औटी,नामदेव औटी,जालिंदर औटी,अतिश औटी,गणेश हाडवळे,राजेश कणसे,संतोष हाडवळे,मच्छिन्द्र हाडवळे,अमोल बांगर,स्वप्नील हाडवळे,सर्व ग्रामपंचायत कर्मचारी
तसेच गावातील ३० ते ४० युवकांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दिपक शेठ औटी,राजुरी गावच्या सरपंच सौ.प्रियाताई हाडवळे,उपसरपंच माऊली शेठ शेळके,विवेक शेळके,ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ,कामगार तलाठी धनाजी भोसले व राहुल कुमावत,समर्थ शैक्षणिक संकुला चे विश्वस्त वल्लभ शेळके,राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा.अरविंद ढोबळे,प्रा.अमोल दिघे,प्रा.भूषण दिघे आणि राष्ट्रीय सेवा योजेनेचे ५५ विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close