समर्थ ज्युनियर कॉलेजमधील पायल गुंजाळला सीईटी परीक्षेत ९९.१५ पर्सेंटाईल गुण :समर्थ ज्युनियर कॉलेज चा “समर” उपक्रम यशस्वी

बेल्हे -( दि २०) प्रतिनिधी
१२ वी नंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी,आर्किटेक्चरकृषी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी,जेईई,नीट इ.स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागते.ग्रामीण भागातील विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेमध्ये मागे पडू नये म्हणून समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या व शिक्षकांनी एकत्र येऊन दैनंदिन वेळापत्रक व उन्हाळी-हिवाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना सीईटी चे मार्गदर्शन सुरु केले.शिक्षक व विद्यार्थी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे समर्थ ज्युनियर च्या मुलांनी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या सी ई टी परीक्षेमध्ये लक्षनीय यश मिळविले आहे.विशेषत: गुळूंचवाडी गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील पायल गुंजाळ हिने एमएचटी-सीईटी २०२२ परीक्षेमध्ये ९९.१५ पर्सेंटईल गुण मिळवून यश संपादन केले आहे.तिच्याबरोबर वृषाली शिंदे-८९.७२ (पीसीएम),८३.६०( पीसीबी),स्नेहल गवारी ८३.९४ (पीसीबी) याही विद्यार्थिनींनी चांगली कामगिरी केलेली आहे.
या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन या वर्षीसुद्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षमध्ये प्रविष्ठ होऊन चांगले गुण संपादन करावेत यासाठी विशेष प्रयत्नशील असल्याचे प्रा.विनोद चौधरी यांनी सांगितले.
समर्थ ज्युनियर कॉलेज हे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध असल्याचे प्राचार्या वैशाली ताई आहेर यांनी सांगितले.
या विद्यार्थ्यांना प्रा.विनोद विनोद चौधरी,प्रा.अमोल खामकर,प्रा.रोहिणी औटी,प्रा.नूतन पोखरकर,प्रा.शुभांगी सोळसे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,खजिनदार तुळशीराम शिंदे,विश्वस्त वल्लभ शेळके,प्रा. राजीव सावंत,मेहबूब काझी सर,आरिफ आतार,संतोष पाटे यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close