समर्थ इंजिनिअरिंग मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या नवीन अभ्यासक्रमास मान्यता

बेल्हे -( दि १७) प्रतिनिधी
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलीजन्स व मशीन लर्निंग’ (प्रवेश क्षमता-६०) हा नवीन अभ्यासक्रम शै.वर्ष २०२२-२३ पासून सुरु करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
आजच्या स्पर्धेच्या युगात आधुनिक काळाशी सुसंगत आणि जीवनातील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या अभ्यासक्रमास मान्यता प्राप्त झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे.डिजिटल गोष्टीमध्ये ए-आय चा खूप फायदा होऊ शकतो.सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने आर्टिफिशियल इंटेलीजन्स अँड मशीन लर्निंग चा हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे.स्मार्टफोन्स,ऑनलाईन बँकिंग व्यवहार,ऑनलाईन डेटा,फाईल्स ए आय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षित राहू शकतात.कोणीही ह्यांना हॅक किंवा एक्सेस करू शकणार नाही.त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल.
विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डेटा सायंटिस्ट,ए-आय इंजिनियर,रोबोटिक्स सायंटिस्ट,मशीन लर्निंग इंजिनियर,बिझनेस इंटेलीजन्स डेव्हलपर,प्रोडक्ट मॅनेजर,रिसर्च सायंटिस्ट,बिग डेटा इंजिनियर,ए-आय डेटा अनालिस्ट अशा विविध पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध आहे.ई-कॉमर्स,आरोग्य,शिक्षण,सहकार व तंत्रज्ञान,ऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे.ती कमतरता भरून काढण्यासाठी आर्टिफिशियल इंटलीजन्स अँड मशीन लर्निंग हा अभ्यासक्रम आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत सुरु करण्यात आलेला आहे.या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया महाराष्ट्र शासन व डी टी ई मार्फत ऑनलाईन राबविण्यात येत असून उत्तर पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी-पालक वर्गाच्या मागणीनुसार बदलत्या तंत्रज्ञानाची ओळख ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने सदर अभ्यासक्रम सुरु करत असल्याचे अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी सांगितले.
प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी प्रा.प्रदीप गाडेकर-९६३७२३८०३४ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close