पिंपळवंडीमध्ये काकडे परीवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिरात साडेचारशे रूग्णांची तपासणी

पिंपळवंडी -( दि १६) प्रतिनिधी
पिंपळवंडी (ता जुन्नर) सदगुरुनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यामध्ये एकूण चारशे पन्नास रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असल्याची माहिती विघ्नहर सहकारी साखर कारखाना व शिवचिदंबर ट्रॅक्टरचे संचालक विवेक
काकडे यांनी दिली
येथील दिवंगत विमलताई वसंतराव पाटील काकडे यांचे प्रथम पुण्यस्मरानिमित्त पिंपळवंडी ( सदगुरुनगर) येथील शिवचिंदबर ट्रॅक्टर्सचे आवारात समाजप्रबोधनकार ह.भ.प.निव्रुत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तनाचे व नारायणगाव येथील डाॅ मनोहर डोळे मेडीकल फाउंडेशनच्या मोहन ठुसे नेत्र रूग्णालय व काकडे परिवार यांच्या वतीने या मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य शरदराव लेंडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांनी दिवंगत विमलताई काकडे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली व्यक्त केली
या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर उपाध्यक्ष अशोक घोलप जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेत्या आशाताई बुचके लाला अर्बन बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखले, जितेंद्र गुंजाळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे उपतालुका प्रमुख मंगेश काकडे नेताजी डोके रघुनाथ लेंडे अतुल भांबेरे सुरज वाजगे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक भास्कर घुले सेक्रेटरी अरुण थोरवे चीफ इंजिनियर बाळासाहेब शिंदे विघ्नहर साखर कारखान्याचे आजी व माजी संचालक व सर्व अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी सर्व उपस्थितीतांचे स्वागत विघ्नहरचे माजी संचालक बाळासाहेब काकडे व विद्यमान संचालक विवेक काकडे यांनी केले
या शिबिरात आपल्या कष्टमय जीवनातून संसाराला हातभार लाउन समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करणाऱ्या आदर्श माता अंजना पायमोडे विमलताई काकडे अंजली पवार गिताबाई वाघ जिजाबाई ढोले या पाच आदर्शमातांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
या शिबिरात एकूण चारशे पन्नास रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन त्यांना औषधे देण्यात आली तर तीनशे चाळीस रूग्गांना मोफत नंबरचे चष्मा वाटप करण्यात आले तर अकरा मोतीबिंदू रूग्णांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी पिंपळवंडी आणि पंचक्रोशीमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते