धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळाचा सांस्कृतिक कला महोत्सव जल्लोषात संपन्न : समूह नृत्य स्पर्धेत नक्षत्र ग्रुप अव्वल

राजुरी ( दि ८) प्रतिनिधी
धर्मवीर संभाजी राजे गणेश मंडळ राजुरी आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव २०२२ अंतर्गत नुकतेच भव्य समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन शिवशक्ती मंगल कार्यालय राजुरी येथे आयोजित करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन धर्मवीर संभाजी राजे मंडळाचे अध्यक्ष व गावचे उपसरपंच माऊली शेठ शेळके व सरपंच सौ.प्रिया ताई हाडवळे तसेच संस्थापक शिवाजीराव हाडवळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहल शेळके,एम. डी.घगाळे,वल्लभ शेळके,बाळासाहेब हाडवळे,बाळासाहेब औटी,विवेक शेळके,लक्ष्मण घंगाळे,संदीप औटी,सुदाम औटी,संजय औटी,राजेंद्र हाडवळे,संजय पिंगळे,अशोक हाडवळे,राजेंद्र औटी,रविंद्र रायकर,अशोक डौले आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर स्पर्धेसाठी पुणे,कोथरूड,मुंबई,पारनेर,शिर्डी, नारायणगाव,अहमदनगर,निघोज,श्रीरामपूर,तळेगाव दाभाडे अशा विविध शहरांतून जवळपास २५ ग्रुप सहभागी झाले होते.यावेळी सहभागी स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद आणि उत्साह दिसून आला.
प्रथम क्रमांक रु.१५ हजाराचे बक्षीस नक्षत्र ग्रुप श्रीरामपूर व एस.जी.ग्रुप पुणे यांना विभागुन देण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे ११ हजार रुपयांचे बक्षीस मंगळागौर ग्रुप राजुरी व क्यु झाॅटिक पुणे यांना विभागुन देण्यात आले.
तृतीय क्रमांकाचे ७ हजार रुपयांचे बक्षीस टी.आर.सी.नारायणगाव व कलाविष्कार आळेफाटा यांना देण्यात आले तर चतुर्थ क्रमांक एम.डी.ए.ग्रुप पुणे व सँडी शिंदे ग्रुप मंचर यांनी पटकावला त्यांना ५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले व पाचव्या क्रमांकाचे बक्षीस डोला ग्रुप पुणे यांना ३ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
विजेत्या संघाला मान्यवरांच्या हस्ते शाल,सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
सहभागी झालेल्या ग्रुपने कोळी गिते, मंगळागौर,लावणी,गणपती बाप्पांवर आधारित असलेली गाणी सादर केली.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ.जयसिंग गाडेकर,डॉ.अरुण गुळवे,प्रा.प्रदिप गाडेकर यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जी.के.औटी सर यांनी केले तर आभार वल्लभ शेळके सर यांनी मानले.
फोटो-समुह नृत्य स्पर्धेत श्रीरामपूर येथील नक्षत्र ग्रुप नृत्य सदर करताना