वडगाव कांदळीत बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला : बिबट्याने तिन शेळ्या व एका करडाचा पाडला फडशा

वडगावकांदळी -( दि ८) प्रतिनिधी
वडगाव कांदळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मुक्कामी असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने
हल्ला करुन तिन शेळ्या व एका करडाचा फडशा पाडला ही घटना सोमवारी ( दि ८) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली

याबाबत सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील साकुर येथील मेंढपाळ चिमाजी सोन्नर व कांताराम पोकळे यांच्या मेंढ्यांचा वाडा वडगाव कांदळी येथील शेतकरी अनंथा पाचपुते यांच्या शेतात मुक्कामी होता सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने या मेंढपाळांच्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला यावेळी त्यांच्या कुत्र्याने बिबट्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याने या कुत्र्याच्या कानाला चावा घेऊन जखमी केले त्यानंतर बिबट्याने कळपातील शेळ्यांवर हल्ला केला त्यामधील एक शेळी व करडू बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला नेऊन फडशा पाडला तर दोन शेळ्या बाजूच्या उसात नेल्या मेंढपाळांनी सकाळी या दोन शेळ्यांचा उसात शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ऊसातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज येत असल्यामुळे या शेळ्यांचा शोध लागला नसल्याचे चिमाजी सोन्नर यांनी सांगितले याबाबत वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर खोडद विभागाचे वनरक्षक विशाल गुंड व नाथा भोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्यांची दहशत कायम आहे त्यामुळे या श्री बिरोबा मंदिर परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी उपसरपंच संजय खेडकर यांनी केली आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close