सुंदरबाई दगडूशेठ सोनवणे यांचे निधन

पिंपळवंडी -( दि ३) प्रतिनिधी

चाळकवाडी ( ता जुन्नर) येथील सुंदरबाई दगडूशेठ सोनवणे ( वय ७५ वर्ष) यांचे शुक्रवारी ( दि २९जूलै) रोजी रात्री सव्वाबारा अल्पशा आजाराने निधन झाले.
सन १९६४ मध्ये चाळकवाडी येथील श्री दगडूशेठ बाबुराव सोनवणे यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. दगडूशेठ सोनवणे हे मुंबईत ब्ल्यू स्टार कंपणीत नोकरी करत होते व सुंदरबाई या गावी चाळकवाडी या ठिकाणी होत्या. त्यावेळी एकत्रित कुटुंबात थोरली सुन म्हणून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली ही जबाबदारी स्वीकारत असतानाच त्यांनी शेती व्यवसाय संभाळला दिवसभर शेतात कष्ट करुन त्यांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक बाबीत भर घातली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे विवाह झाल्यानंतर सन १९६५ मध्ये कुकडी डाव्या कालव्यावर मजुरीचे काम केले व त्यांच्या मुलांना शिक्षण देऊन उच्चशिक्षित केलेे शांत संयमी व प्रेमळ स्ववभावामुळे त्यांनी सर्व नातेेवाईकांमध्ये आपल्या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. त्यांची मळगंगा मातेवर अपार श्रद्धा होती घरात श्रावण महिण्यात नवनाथ ग्रंथवाचन केले व त्यानंतर अखरच्या क्षणापर्यंत नवनाथ ग्रंथ वाचन केले.

त्यांच्या निधनामुळे सोनवणे व जोरे कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामागे पती दगडूशेठ मुले सुरेश, विजय , दिपक, मिननाथ सुना शैला, मनिशा, नंदा ,प्रणाली पुतन्या सुवर्णा शेलार, आनिता वाळुंज, पुनम फुलपगार नातवंनडे अनिकेत, वैश्णवी, अदित्य, संस्कार, स्रुष्टी, श्नेया, सातविक ,अर्जुन असा परीवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक ७ आँगष्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ७-३० वाजता कुकडीनदीच्या तीरावर पिंपळवंडी स्टँड येथे होणार असून यावेळी ह.भ.प.पंकजमहाराज गावडे यांचे प्रवचन होणार आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close