उदापूरला बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

ओतूर ( दि २० जानेवारी) प्रतिनिधी
उदापूर ( ता.जुन्नर ) येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
लता चंद्रशेखर कदम वय ४२ वर्षे ,रा. नेतवड,ता.जुन्नर जि.पुणे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे हे अधिक माहिती देताना म्हणाले की, लता कदम ह्या पती चंद्रशेखर कदम यांच्या बरोबर मंगळवरी दि.१८ नेतवड येथून उदापूर कुलवडे मळ्याकडे पती बरोबर दुचाकीवरून जात असताना कुलवडे मळ्याजवळील ओढा ओलांडताना रात्री साडेनऊ वाजता बिबट्याने अचानक दुचाकीवर झडप मारल्याने कदम पती पत्नी दुचाकीवरून खाली पडले.या हल्ल्यात लता यांच्या डाव्या पायाला बिबट्याने गंभीर जखमी करून बिबट्याने धूम ठोकली. या घटनेची माहिती उदापूर ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद भोर यांनी उदापूरचे वनरक्षक सुदाम राठोड यांना दिली. सबंधित घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे,वनरक्षक सुदाम राठोड,वनरक्षक अतुल वाघोले यांनी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन जखमी
लता कदम यांची भेट घेतली.
लता कदम यांच्यावर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढिल उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असल्याची माहिती दिली.
——————————————————————————-
हा परिसर बिबट्या प्रवणक्षेत्रात येत असल्याने परिसरात बिबट्यांचा वावर आहे,नागरिकांनी रात्रीच्यावेळी सतर्क रहावे, रात्री शेतात काम करण्यासाठी शक्यतो एकट्याने घराबाहेर पडू नये,शेतीची कामे दिवसा करावीत.,लहान मुलांची काळजी घ्यावी.शेतकऱ्यांनी शेतात आपल्याबरोबर रात्रीच्या वेळी मोठ्या आवाजाची साधने वापरावीत
– वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे
.