समर्थ शैक्षणिक संकुलात शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

बेल्हे -( दि २०) प्रतिनिधी
शिक्षक हा समाजाचे प्रतिबिंब असतो.आनंदाने जगावे कसे हे शिकविणारा शिक्षक संस्काराचे विद्यापीठ आहे.इच्छाशक्ती,नियोजन व अविरत प्रयत्नाच्या जोरावर आदर्श समाजाची उभारणी शिक्षक करू शकतो असे मत जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतीलाल बाबेल यांनी बेल्हे येथे व्यक्त केले.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) व जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे शिक्षक-प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यावेळी रतीलाल बाबेल बोलत होते

या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,तज्ञ मार्गदर्शक प्रा.शीतल ठुसे,प्रा.तानाजी वामन,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,डॉ.शिरीष गवळी,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी तयार करणे गरजेचे आहे.प्राविण्याचा आणि नावीन्याचा शोध घेण्यासाठी सक्षम विद्यार्थी शिक्षक तयार करू शकतो.शिक्षकांच्या तळमळीमुळे मुले बदलतात.शिक्षकाचा जिवंत संस्कारक्षम मनाशी संबंध येतो. संस्कारक्षम मुलांना साद आणि प्रतिसाद देण्याची गरज आहे.वाचलेले विसरले जाऊ शकते,पाहिल्याने स्मरणात राहते म्हणून मुलांना कृती करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी असे मत रतीलाल बाबेल यांनी मांडले.
तज्ञ मार्गदर्शक प्रा.शीतल ठुसे म्हणाल्या की,शिक्षक हाच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारा स्रोत असतो.विद्यार्थी हे अनुकरणीय असतात. शिक्षकाचे बोलणे,हावभाव याचे अनुकरण मुले करत असतात.यासाठी शिक्षकाचे वागणे आदर्शवत असावे.ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये देखिल प्रत्येक विषय कसा रंजक करून शिकवला जाऊ शकतो याबाबत मार्गदर्शन करत,विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यासाठी नवनवीन शिक्षण साहित्य प्रणालीचा वापर करून विद्यार्थी घडवावेत असे शीतल ठुसे म्हणाल्या.
प्रा.तानाजी वामन म्हणाले की अध्ययन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी स्वतः निर्माण केलेले शैक्षणिक साहित्य तासाला घेऊन जावे.शिक्षकांनी उत्तम फलक लेखन करावे.मला काय शिकवायचे आहे? याची तयारी करूनच वर्गावर गेल्याने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया यशस्वी होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य राजीव सावंत यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.प्रदीप गाडेकर यांनी मांडले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादिका - सौ.वंदना विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close