समर्थ शैक्षणिक संकुलात युवा स्वास्थ्य मिशन अभियानांतर्गत ६५० विद्यार्थ्यांचे लसीकरण

बेल्हे -( दि १७) प्रतिनिधी

राज्यातील विद्यार्थ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी “मिशन युवा स्वास्थ्य अभियान” राबवण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने तंत्रशिक्षण विभाग व आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र,बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत कोव्हीड १९ लसीकरण मोहिमेचे आयोजन बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके व बेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,ज्युनियर कॉलेज च्या प्राचार्या वैशाली ताई आहेर,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग,उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे.त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष,विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष समर्थ संकुलात उभारलेले आहेत.
लस आणि लसीकरणासाठी आवश्यक असणारे कर्मचारी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे यांच्याकडून वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवाजी फड तसेच आरोग्य सहाय्यक महिला श्रीमती मीराबाई ढमढेरे,आरोग्य सेवक उत्तम लबडे आरोग्य सेवक उषा गोरडे श्री उत्तम लबडे,आरोग्यसेवक श्री जगदीश ताजवे,श्रीमती कविता पाबळे,
डाटा ऑपरेटर राहुल शेळके,ड्रायव्हर गोविंद गुंजाळ,पारवे मावशी यांचे सहकार्य लाभले.
यावेळी संकुलातील पॉलिटेक्निक,ज्युनियर कॉलेज,आय टी आय या विभागातील ६५० विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी प्रा.संजय कंधारे यांनी विशेष प्रयत्न केले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादिका - सौ.वंदना विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close