ग्राहकांनी आयोगाकडे तक्रार करण्यासाठी इ – दाखील या कार्यप्रणालीचा वापर करावा:अॅड.तुषार झेंडे पाटील

बेल्हे -( दि ५) प्रतिनिधी

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,महाराष्ट्र शासन तहसील कार्यालय जुन्नर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर जि.पुणे यांच्या विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक जागरण सप्ताह समारोप समारंभ नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे पार पडला.
कार्यक्रमाचे उदघाटन महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अॅड. तुषार झेंडे पा. व आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी व महावितरण चे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले हे होते.

यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके,महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले,मंडल कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे,ग्राहक पंचायत जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे,संघटक शैलेश कुलकर्णी,ग्राहक पंचायत जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर,प्रबोधन समिती चे ह.भ.प.विशाल महाराज हाडवळे,कौसल्या फापाळे, देवराम तट्टू ,बाळासाहेब गुंजाळ,पप्पूशेठ गुंजाळ,नरेंद्र गंगे,पांडुरंग गंगे,दिगंबर खुटाळ,खंडू पाटील,संतोष देशमुख,बाबू शिंदे,संतोष नेहरकर,अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा कान्होरे व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अॅड.तुषार झेंडे पाटील उपस्थितांशी चर्चात्मक संवाद साधत म्हणाले की,ग्राहक घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून तक्रार दाखल करून ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकतात.ग्राहक त्यांच्या तक्रारीची सुनावणी देखील ऑनलाईन माध्यमातुन घरी बसून मोबाईलद्वारे करता येते.तसेच निकाल देखील ई-मेलच्या माध्यमातून घरबसल्या मिळू शकतात.सुटे पैसे नाहीत म्हणून दुकानदार तुम्हाला गोळ्या-चॉकलेट देऊ शकत नाही.एक किंवा दोन रुपये सुटे नाहीत म्हणून बऱ्याचदा दुकानदार एक रुपयाच्या गोळ्या किंवा चॉकलेट देतात.दिलेलं वचन न पाळल्यास कंपनीवर देखील कारवाई होऊ शकते.जाहिरातीमध्ये दिलेलं वचन न पाळल्यास तुम्ही कंपनीवर दावा तर ठोकू शकतातच,पण त्याचबरोबर त्या उत्पादनाची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीवरही दावा करू शकता.यावेळी नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बाबत अॅड.झेंडे यांनी सविस्तरपणे विश्लेषणात्मक माहिती दिली.
प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी म्हणाले कि ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने ग्राहकांचे हक्क,जबाबदाऱ्या व कर्तव्ये समजावून घेतली पाहिजेत.२४ डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा मुलाधार असून या देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी, ग्राहक,व्यापारी,उद्योजक आणि श्रमिक हे पंचप्राण आहेत.या सर्वांनी एकत्र येऊन आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी
एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना ग्राहकांचे हक्क आणि जबाबदाऱ्या याची माहिती करून देणाऱ्या ६ बाबींची विस्तृत माहिती देत त्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सुरक्षेचा हक्क,माहितीचा हक्क,निवड करण्याचा हक्क,तुमचे म्हणणे मांडण्याचा हक्क,तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा हक्क तसेच ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार याविषयी उदाहरणासहित माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी,प्रास्ताविक अशोक भोर यांनी तर आभार संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी मानले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close