महात्मा फुलेंचे विचार समाजासाठी प्रेरणादायी:डॉ.लक्ष्मण घोलप

बेल्हे -( दि १ डिसेंबर) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,डॉ.महेश भास्कर,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.महेश भास्कर म्हणाले की,महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली.तसेच मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली.स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली.त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.अशा या थोर समाजसेवकांच्या प्रति आपण सर्वजण कृतज्ञ राहून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊयात आणि आपले इप्सित शैक्षणिक कार्य अखंडितपणे समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवू या असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके यांनी केले.
महात्मा फुलेंचे विचार समाजासाठी प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी थोर समाजसुधारकांच्या आदर्श घेऊन भविष्यात यशस्वी वाटचाल करावी असे यावेळी प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close