समर्थ इंजिनिअरिंग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड

बेल्हे -( दि १) प्रतिनिधी
समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे(बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांची मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटिल यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सदर निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
*कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग-*
*संध्या लबडे व काजल दाते* या विद्यार्थीनींची *कॉग्निझंट* मध्ये, *ऋतुजा लबडे व अनुप गटकळ* यांची *कॅपजेमिनी* मध्ये तर *श्रद्धा डुंबरे* हिची *इंफिमाईंड प्रा.* मध्ये आणि *कावेरी शिंदे* या विद्यार्थिनीची *टी सी एस म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस* या कंपनीमध्ये निवड झाली.
सदर विद्यार्थिनींना ४ लाखाचे पॅकेज देण्यात येणार असल्याचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी सांगितले.
संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,जावा व फुल स्टॅक डेव्हलपर मधील तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केला जातो.
समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रम नेहमी सातत्याने राबवले जातात.त्यामध्ये सॉफ्ट स्किल,संभाषण कौशल्ये,मुलाखतीच्या विविध कार्यशाळा,तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम,औद्योगिक सहल,व्याख्यानमाला,नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रॅक्टिकल यांसारखे कार्यक्रम इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट सेल मार्फत आयोजित केले जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानात भर पडते.
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या मार्फत या वर्षी विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५४ पर्यंत पोहोचली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवून नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य डॉ.अनिल पाटील,एम बी ए चे प्राचार्य प्रा.राजीव सावंत,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.