सोलापूरमध्ये चौदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी संपन्न

सोलापूर -( दि २९)-राजेंद्रकुमार शेळके

१४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. साहित्य रत्न राजकुमार काळभोर साहित्य नगरीत या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.१४ वे महात्मा ज्योतिबा फुले अखिल भारतीय मराठी प्रबोधन साहित्य संमेलन साहित्य रत्न राजकुमार काळभोर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात करण्यात आली.
पुण्य केल्याने जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन मिळतो असे मत यावेळी सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद भोसले यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ स्मिता मेहत्रे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेशजी टोपे,राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभंगीताई काळभोर, प्रदेशाध्यक्ष कवी फुलचंद नागटिळक,सिने अभिनेते नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात ग्रंथ दिंडी,पुस्तक प्रकाशन, व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
द्वितीय सत्रात सर्व आमंत्रित कवींच्या सादरीकरणाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. यावेळी कवी अनिल केंगार, उज्वला शिंदे,शशिकला गुंजाळ, सायली देशपांडे, मारुती कटकधोंड, सुनीता कपाळे, निशा कापडे,विठ्ठल धाडी,पुष्पा करे,संगिता लंघे,जयश्री नांदे,राजेंद्रकुमार शेळके, संगिता जामगे आदींसह अनेक नामवंत कवींनी आपल्या रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष गाथा आपल्या मनोगतात अतिशय सुंदर मांडली.
यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना परिषदेच्या वतीने विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता विश्व पसायदानाने करण्यात आली.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close