कोथंबीर झाली मातीमोल पिकात सोडाव्या लागल्या शेळ्या व मेंढ्यां

पिंपरी पेंढार ( दि २९) सुयश डेरे

जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावाचे शेतकरी अशोक रामचंद्र जाधव या शेतकऱ्यांने आपल्या एक एकर क्षेत्रात बाजार भाव मिळून नफा मिळेन या अनुषंगाने कोथंबिर पिक घेतले होते त्यामध्ये त्यांना तीस हजार रुपये खर्च आला आहे. परंतु निसर्गाचा लहरीपणा आणी पडलेले बाजार भाव यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी अक्षरशः हाताशी आलेल्या कोथंबिरच्या पिकामध्ये शेळ्या मेंढ्या सोडल्या आहेत.
जुन्नर तालुका खरतर एक बागायतदार सुजलाम सुफलाम तालुका म्हणुन ओळखला जातो. परंतु सध्या जुन्नर तालुक्यातच़ नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कुठल्याच़ पिकाला किमान बाजारभावही मिळत नाही.आमच्या सारखी अशी वेळ इतर शेतकऱ्यांवर येऊ नये म्हणून कोथंबिरच़ नव्हे तर सर्वच पिकांना किमान बाजार भाव मिळावा अशी विनंती शेतकरी बांधवांनी सरकारला केली आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close