श्री क्षेत्र ओझर येथे संपन्न झाले तीन दिवसांचे लसीकरण

ओझर (दि २७)-: राजेंद्रकुमार शेळके -विभागीय संपादक

प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव अंतर्गत ,उपकेंद्र ओझर अंतर्गत नुकतेच श्री क्षेत्र ओझर नंबर एक,ओझर नवीन गावठाण व हिवरे बुद्रुक या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या कोव्हीशील्ड डोसचे तीन दिवसांचे लसीकरण सत्र आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसांच्या लसीकरणा मध्ये जवळजवळ 531 लाभार्थ्यांनी या लसीकरणाचा लाभ घेतला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ वर्षा गुंजाळ यांनी दिली
या लसीकरणासाठी या गावातील स्थानिक ग्रामस्थांनी लसीकरणासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .हे लसीकरण सत्र यशस्वी करण्यासाठी या तिन्ही गावचे सरपंच निलेश बेनके ,मथुरा ताई कवडे, सौ.तारामती कर्डक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी सचिन कवडे अनिल भालेराव,गणेश रवळे, तलाठी धनाजीराव भोसले ,उपसरपंच विठ्ठल जाधव, ग्रा.पं स.अनिल मांडे ,शिरीष बोर्हाडे , खिलारी भाऊसाहेब , ग्रामपंचायतचे सरपंच ,उपरपंच सर्व सदस्य ,त्याचप्रमाणे आरोग्य अधिकारी वर्षाताई गुंजाळ ,आरोग्य सेविका आयोध्या हांडे ,आरोग्य सेवक अजय कासवदे त्याचप्रमाणे आशा वर्कर्स वृषाली घेगडे ,मीना राऊत ,शुभांगी मांडे , रोहिणी औटी ,हसीना शेख ,छाया बेनके यांनी हे लसीकरण यशस्वी होण्यासाठी मोलाचे असे सहकार्य केले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close