मंगरूळमध्ये उसाच्या फडात आढळले बिबट्याचे बछडे

बेल्हे -(ता.२७) प्रतिनिधी

मंगरूळ येथील गणेशनगर भागात ऊस तोडणी चालू असताना शुक्रवार (दि.२६) रोजी एका शेतात बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. त्या बिबट्याच्या पिल्लांना आई पर्यंत पोचवण्याची कार्यवाही वनविभागाने केली आहे.
याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की मंगरुळ (ता. जुन्नर) येथील गणेशनगर भागात चिमाजी बाबुराव येवले यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना दुपारी चार वाजता दोन बिबट्याची पिल्ले आढळून आली. ग्रामस्थांनी सदर घटना तात्काळ वनविभागाला कळवली. या पिल्लांची माहिती मिळताच ओतूरचे वन परिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनानुसार बेल्हे वनपाल आर.यू .वीर व पारगाव तर्फे आळे वनरक्षक राजू गाढवे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या पिल्लांची डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. अडीच महिने व दुसरं नऊ महिन्याचे नर व मादी अशी दोन पिल्ले होती. तसेच या पिलांना त्यांच्या आईपर्यंत पोहोचण्याची कारवाई केली.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close