बेल्हे गावामधील तमाशा महोत्सवाचे वेगळेपण – भाग 2

प्रा.काशिनाथ आल्हाट सर ( तमाशा अभ्यासक)

बेल्हे नगरीतील दोन तीन दिवसाचा तमाशा महोत्सव आता फक्त बेल्हे गाव आणि जुन्नर तालुक्या पुरता राहिला नाही. तर त्याची महती संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली आहे. कारण बेल्हे नगरीला तमाशा कलेचा आणि पारंपरिक कलेचा इतिहास आहे.
बेल्हे नगरीतील पूर्वीच्या काळातील गाजलेले कलाकार होते. त्यापैकी विष्णू बांगर , अहमद भाई बेपारी, नाथा बुवा बांगर ,गेनभाऊ बांगर,सदाशिव पाटील संभेराव यासारख्या कलावंता बरोबरच राज्य पुरस्कार प्राप्त संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर तमाशा कलेतील कोहिनूर हिरा या मातीत विसावला.
संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी तमाशाचे केंद्र म्हणून बेल्हे गावची निवड केली होती. दत्ता महाडिक यांनी अखेरच्या जीवनाचा श्वासही याच पवित्र मातीत घेतला. गाडी घुंगराची फेम विलास अटक,ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी शशिकला शुक्रे , सुलोचना नलावडे, नंदा नलावडे,प्रसिद्ध गायक नंदू अटक, सुनिल अटक, न्रुत्यागंना मंगल थोरात, ताशासम्राट बशिरभाई बेपारी, ईस्माईलभाई बेपारी यासारखे अनेक कलावंत येथे वास्तव्यास आहेत खरं सांगू का ?तमाशा महोत्सव भरविणे हे सामान्य व्यक्तीचे कार्य नाही . तमाशा महोत्सव भरवला की, अनेकांच्या टिका टिप्पणीला सामोरे जावे लागते. जे काही करीत नाहीत .ते टीका करण्यास सर्वात पुढे असतात. परंतु त्याचा विचार न करता वसंतराव जगताप आणि सदाशिव बोरचटे ही
मंडळी संघर्षातून वाट काढतात.
आर्थिक वनातून जीव मुठीत धरून जातात.

असे नेहमी म्हटले जाते की ,”सर्व गोष्टींचे सोंग करता येते, पण पैशाचे सोंग करता येत नाही” तमाशा महोत्सव भरविणे म्हणजे लाखो रुपयांची जुळवाजुळव करणे होय .
“तमाशा महोत्सव आनंदाने साजरा होतो .पण त्यामागील बाजू अतिशय जिकरीची,जिद्दीची ,कष्टाची,मेहनीतीची असते”.
परंतू तमाशा महोत्सवाचे मुख्य प्रवर्तक वसंतरावजी जगताप आणि त्यांची नियोजन समिती कधीही या दुसर्‍या बाजूची पाने चाळत नाहीत . कार्य करणे हे त्यांचे ध्येय आहे .”एखाद्या चांगल्या कामाला अनंत अडचणी येतात.” अशीच त्यांच्या मनाची भावना असते. त्या अडचणी सोडवणे म्हणजे खरे यश असे ते मानतात.
महोत्सवाच्या विविध कामासाठी लाखो रुपयांच्या खर्चाची तरतूद करावी लागते. ती ही समिती करते.यासाठी समितीने स्वतंत्र श्री साई कृपा चँरीटेबल ट्रस्ट स्थापन केला आहे.मित्र परिवाराच्या दातृत्व निधीतून हा सगळा सोहळा साजरा केला जातो स्थापन केलेल्या पतसंस्थावर आर्थिक भार ते तमाशा महोत्सवाचा कधीही टाकत नाहीत हे वेगळे पण आहे डॉ. राजपंखे यांची गाजलेली गझल आहे.
,”घर नव्याने बांधले पाहिजे. जुन्या जळमटांना जाळले पाहिजे.!
रोप लावायच्या अटीवर पुन्हा ,भर उन्हाळ्यातही ते पोसले पाहिजे”झाड लावा याच्या अटीवर ते वाढविले पाहिजे.
त्याप्रकारे तमाशा महोत्सव बरविण्याची संकल्पना अनेकांच्या मनात घोळत असेल ,तर डॉ.राजपंखे यांची गझल म्हणते ,उन्हाळ्यातही झाड लावायाचे ते वाढविले पाहिजे. तमाशा महोत्सव भरविणे.म्हणजे उन्हाळ्यात झाड लावल्या सारखे आहे .एक वर्ष तमाशा महोत्सव केला आणि बंद पडला असे होता कामा नये त्याप्रमाणे झाडे लावण्याची संकल्पना भरपूर असते
परंतु त्या संवर्धनाकडे कोणी पाहात नाही.

.तमाशा महोत्सव भरविण्याची संकल्पना अनेकांची असू शकते .यासाठी आर्थिक तरतूद कायम स्वरुपाची सद्यस्थिती व
भविष्यात ही तरतूद करावी लागते श्री साई कृपा चँरीटेबल ट्रस्टचे सर्व मान्यवरांनी ती करून ठेवली आहे हे वेगळेपण पाहावयास मिळते .
खर तर! खऱ्या अर्थाने महोत्सवाच्या निमित्ताने हा तमाशा महोत्सव असतो या निमित्ताने विविध क्षेत्रातील विचारवंत, अभिनेते, साहित्यिक, कवी, कथाकार ,अभ्यासक अभिनेत्री यासारख्या मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्या विचारांची पेरणी केली जाते.त्याचे अनेक लाभार्थी होतात.

तमाशा महोत्सवाच्या निमित्ताने दत्ता महाडीक यांनी गायलेली गाणी जशीच्या तशी त्याच आवाजात श्री साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव जगताप यांच्या आवाजाची गाणी ऐकायला मिळतात .याचा लाभ दररोज हजारो रसिक घेतात.
याशिवाय सरकार दरबारी या तमाशा महोत्सवाचे नोंद घेतली जाते. शासकीय अधिकारी या तमाशाला हजेरी लावतात.तमाशा हे महाराष्ट्राचे लोककलेचे धन आहे.’ते टिकवण्यासाठी सरकार दरबारी मागणी केली जाते. तमाशा महोत्सवाच्या निमित्ताने तमाशा फडमालक आणि कलाकार कलावंत यांची गा-हाणी ऐकून घेऊन मंत्रीमहोदयांच्या समोर ती मांडली जातात त्याचा पाठपुरावा केला जातो हे या तमाशा महोत्सवाचे एक वेगळेपण
संगीतरत्न दत्ता महाडिक यांची पुण्यतिथी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यावेळी त्यांचा सर्व परिवार उपस्थित असतो.
संगीतरत्न दत्ता महाडिक यांची पुण्यतिथी ती या गावातच का ? तर संगीतरत्न दत्ता महाडिक आणि या ग्रामस्थांची त्यांच्या कलेच्या नात्याची गुंफण जडली होती. त्या काळात
आर्थिक संकट काळात दत्ता महाडिक यांना सह्याद्रीसारखे हे पाठीमागे राहिले. पाठराखण अनेक ग्रामस्थांनी केलेलीआहे. त्यांच्या कलेवर आभाळभर माया करणारी रसिक आजही बेल्हेगावात आहेत.
दत्ता महाडिक यांनी तमाशा फड चालवताना ज्याप्रमाणे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले होते .त्या दिवसांचे आजही काही दत्ता महाडिक यांचे साथीदार बेल्हे गावात आहे.हे वेगळेपण
संगीतरत्न दत्ता महाडिक यांनी स्वतः काही गीतांची रचना केली. त्यांच्या गाण्यांना ते स्वतः स्वरबध्द करत .तालबद्ध करत. संगीतरत्न दत्ता महाडिक यांच्या हाताचा ज्या कलाकारांना स्पर्श झाला . अनेकांनी त्यांना गुरुस्थानी मानले.
त्यांचाही नावलौकिक झालेला आहे .
दत्ता महाडिक संगीत क्षेत्रातील कॅप्टन होते. पण त्यांना दाद देणारा रसिकही बेल्हे गावातील तेवढ्याच तोलामोलाचा होता. तमाशा क्षेत्रात अनेक तमाशा फडमालक, तमाशा कलावंत होऊन गेले. परंतु संगीतरत्न दत्ता महाडिक नावानेच फक्त तमाशा महोत्सव का साजरा होतो ?तर त्या पाठीमागील दत्ता महाडिक यांची त्या कलेवरील निष्ठा. दत्ता महाडिक यांना “अण्णा” या टोपण नावाने संबोधले या गावातून संबोधले गेले “दत्ता महाडिक यांनी पैशावर कधी प्रेम केले नाही,
त्यांचे प्रेम कलेवर होते.त्यांच्या कलेचे रसिक हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही पहावयास मिळतात. ‘ रसिक हीच अण्णांची मोठी संपत्ती होती.
शेवटच्या काळात दत्ता महाडिक यांनी स्टेजवर एक तरी गाणे गावे. आणि त्यामुळे ऐकावे यासाठी रसिक येत.असा निश्चय करून येत.
,”वन्स मोर ‘हा प्रतिसाद अण्णांना हयात असतांना ही मिळाला श्र आणि हयात नसतांनाही मिळत आहे.अण्णांची गायकी ऐकण्यासाठी तमाशा रसिक येत असायचा अण्णांची गाणी झाली की तमाशा रसिक उठून आपल्या घरी जायचा अण्णांच्या समोर हा प्रतिसाद मिळत गेला त्या गीतांचा गाण्यांचा बाज यापुढे तसाच जपला गेला पाहिजे. हे या तमाशा महोत्सवाचे वेगळेपण
—————— -क्रमशा

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close