कांदळी चौदानंबर येथे पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा गोळीबारात व्यवस्थापकाचा म्रुत्यू

पिंपळवंडी -( दि २४) प्रतिनिधी)

कांदळी चौदानंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघाजणांनी दरोडा टाकला यावेळी या दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांचा म्रुत्यू झाला आहे ही घटना बुधवारी ( दि २४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली
याबाबत नारायणगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की कांदळी गावच्या हद्दीत असलेल्या चौदानंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेत व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर व लिपिक अंकीता भोर हे दोघेजण दुपारी जेवण करत असताना
एक लालसर शर्ट असलेला व एक निळा रंगाचा शर्ट
घातलेले व दोघाचे डोक्यात हेल्मेट असलेले दोन अज्ञात इसम त्यांच्या काळ्या रंगाची मोटार सायकलवरुन पतसंस्थेत आले व त्यांनी राजेंद्र भोर यांचेकडे पैशाची मागणी केली त्यानंतर त्यांनी राजेंद्र भोर यांच्यावर गोळीबार केला व पतसंस्थेमधील सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांची रक्कम चोरून नेली भोर यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अंकिता भोर यांनी आरडाओरडा केला त्याच वेळी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हरीभाऊ भोर यांनी पतसंस्थेत धाव घेतली व जखमी झालेले राजेंद्र भोर यांना उपचारासाठी नारायणगाव येथे नेले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा म्रुत्यू झाला
या घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक डाॅ अभिनव देशमुख जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास देशपांडे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रुथ्वीराज ताटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व या घटनेचे सी सी टीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close