बेल्हे गावामधील तमाशा महोत्सवाचे वेगळेपण भाग -१

शब्दांकन – प्रा.काशिनाथ आल्हाट सर ( तमाशा अभ्यासक)

खरं तर ! दरवर्षी बेल्हे ता.जुन्नर. जि. पुणे येथे तमाशा महोत्सव साजरा होतो .श्री साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक वसंतरावजी जगताप आणि त्यांचे मित्र अतिशय सुंदर नियोजन करतात .त्यामुळे बेल्हेश्वर नगरीत तमाशा रसिक,तमाशा फडमालक, कलावंत आणि तमाशा अभ्यासक येतात. तमाशा अभ्यासकांना ही सुवर्णसंधी असते.
दि.26 नोव्हेंबर व 27 नोव्हेंबर 2021 बेल्हेश्वर नगरीत तमाशा महोत्सव आणि लावणी महोत्सव साजरा होतोय
या महोत्सवा विषयी खर तर ! बोलायचे राहून जातंय महोत्सवावर लिहिताना कोणाचा उदो उदो अथवा त्यांच्या नावाचा प्रचार करून संयोजकांची अथवा आयोजकांची कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडावी असा लिहिण्याचा माझा हेतू नाही. या तमाशा महोत्सवबाबत फार काही इतरांना उपदेश करावा इतका .मी तमाशाचा फार मोठा अभ्यासक नाही. पण दर वर्षी या तमाशा महोत्सवाला हजेरी लावणांरा पैकी मी एक रसिक आहे
तमाशातील विविध घटकांचा अभ्यास करणारा मी एक संशोधक आहे.तमाशा ही परंपरा महाराष्ट्राला लाभलेली वैभवशाली देणगी आहे.
तमाशाला सन 1800 पासूचा इतिहास आहे. महाराष्ट्रातील अनेक गुणवंत कलावंत ,कलाकार घराण्यांनी ही कला आजतागायत जतन करून ठेवली आहे. त्या कलेचा पुढे वारसा जतन करण्याचे काम या ही घराणी करीत आहेत. तमाशा क्षेत्रातील मी फार मोठा अभ्यासक नाही. मी फार मोठा कलाकार नाही. अथवा कलेच्या क्षेत्रातील फार मोठा जाणकार आहे असेही नाही. परंतु माझे वडील हलगी सम्राट केरबा पाटील बस्ती सावरगावकर यांनी तमाशाच्या क्षेत्रात पाच दशके तमाशा रसिकांची सेवा केली .त्यांना राज्य पुरस्कार मिळाला.त्या कलेवर माझा पिंड पोसला गेला. लहानपणापासूनच तमाशा क्षेत्राची आवड .त्यामुळे मी नंतरच्या काळात स्वतःला तमाशा क्षेत्राचा अनुभव येण्यासाठी 5 वर्ष स्वतःचा तमाशा फड केला. त्यातून काही अनुभवाच्या गोष्टी जमेला बांधल्या .प्रत्येक वर्षी या तमाशा महोत्सवाला नटून-थटून येणाऱ्या पैकी एक रसिकl आहे. माझ्या सारखी अनेक तमाशा कलावंतांची मुले या तमाशा तमाशा महोत्सवाला येतात. ही वेगळे पण या तमाशा महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात तमाशा महोत्सव, लावणी महोत्सव ,नाटक महोत्सव ,चित्रपट महोत्सव भरत असतील.पण या सर्वांपेक्षा बेल्हे गावातील तमाशा महोत्सव हा महोत्सव वेगळा आहे. या महोत्सवात वेगळेपण पाहायला मिळते .बेल्हेश्वर नगरीच्या तमाशा महोत्सवात सामान्यांपासून ते प्रमुख पाहुण्यांपर्यंत सर्वांचीच देखभाल आणि सर्वांचा पाहुणचार मनोभावे केला जातो .सर्वांचा सन्मानही केला जातो .”अतिथी देवो भव “या उक्तीप्रमाणे बेल्हेश्वर नगरीत आलेल्या पाहुण्यांचे हृदय पुर्वक स्वागत केले जाते .ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाचा दर्जा दिला जातो. एवढेच नव्हे तर प्रत्येक वर्षी ज्येष्ठ कलावंत अथवा फड मालकांना पुरस्कार देऊन रोख रक्कम दिली जाते.
महाराष्ट्रातून दूरवरून आलेल्या पाहुण्यांची राहण्यापासून ते नाश्ता जेवणाची आपुलकीच्या नात्याने सोय केली जाते. एवढेच नाहीतर तमाशा महोत्सवाचा समारोप झाल्यानंतर दुरदूर गावावरून आलेले मान्यवरांना फोन करून विचारणा केली जाते. आपण सुखरूप पोहोचलात का? याची काळजी घेणारी माणसे आपुलकीचा ठेवा जपतात. ती माणसे म्हणजे वसंतराव जगताप आणि त्यांचे सर्व मित्र संजय विश्वासराव, सावकार पिंगट ,राकेश डोळस ,सूर्यकांत गुंजाळ, गणेश सोनवणे, मच्छिंद्र लामखेडे, नितीन वाघ ,अरुण डावखर , सुनील घोडे, अब्बास बेपारी ,शंकर विश्वासराव, ठकसेन शिंदे, राहुल जगताप ,सौ शुभांगी ताई शेलत, विनोद महाडिक, गणेश सोनवणे ,महादू पिंगट, दिनेश,औटी, नितीन शेठ वाघ ,तुषार भुजबळ, सौ कमलताई भूजबळ, सौ.भिमाबाई गाडगे ,एकनाथ फाकटकर , तसेच प्रमुख पाहुण्यांची जबाबदारी घेणारे अनिल गुंजाळसाहेब.या मित्रांचे सर्वतोपरी उत्तम सहकार्य या असते .हे वेगळेपण या महोत्सवात आपल्याला पाहायला भेटते.
क्रमशा

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close