डॉ.सुमेध सोनवणे यांचा भारतीय विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता या पुरस्काराने सन्मान

पिंपळवंडी -( दि २४) प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी गावचे सुपुत्र व टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथे प्राध्यापक पदावर असलेले तसेच पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून कार्यरत असलेले डाॅ सुमेध गणपत सोनवणे यांचा पुण्याच्या भारती विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उतक्रुष्टता या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले
जुन्नर तालुक्यातील सुपुत्र पिंपळवंडी येथील जीवन शिक्षण मंदिर, शाळा चाळकवाडी (पिंपळवंडी) तसेच गुरूवर्य रा.प. सबनिस विद्यामंदिर, नारायणगाव येथील माजी विद्यार्थी डॉ. सुमेध गणपत सोनवणे यांस भारती विद्यापीठ, वैद्यकिय महाविद्यालय पुणे येथे व्याख्याता म्हणून कार्यरत असताना, भारती विद्यापीठाच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि.१७/११/२०२१ रोजी “शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टता” प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. डॉ. सुमेध सोनवणे सध्या टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालय आणि बा.य.ल. नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथे प्राध्यापक पदावर तसेच पी.एच.डी. मार्गदर्शक म्हणून देखिल कार्यरत असून मुंबई विद्यापीठ, फ़ोर्ट येथे कायदा विभागात (Law Department) मानद प्राध्यापक (Honarary Faculty) असून गुन्हेगारी कायद्याविषयी (Criminal Law) संशोधन करून मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. प्राप्त करत आहेत. डॉ. सुमेध यांनी यापूर्वी दि. १७ नोव्हेंबर २००९ रोजी पुणे विद्यापीठातून (बी. जे. वैद्यकिय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे) मेडिकल एनाटॉमी या विषयातून पी.एच.डी. प्राप्त केली असून, पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सदर विषयातील पहिले आणि एकमेव पी.एच.डी. प्राप्त विद्यार्थी आहेत. त्यांनी वैद्यक पदव्युत्तर आणि पी.एच.डी. शिक्षणाव्यतिरिक्त एल.एल.बी., एल.एल.एम. (गुन्हेगारी कायदा आणि गुन्हेगारी प्रशासन), न्यायसहायक शास्त्र आणि संबंधित कायदे अशा विविध पदव्या पुणे आणि मुंबई अशा नामांकित विद्यापीठातून प्राप्त केल्या आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण भारत देशात डॉ. सुमेध सोनवणे हे एकमेव फ़ोरेंसिक एनाटॉमीस्ट म्हणून कार्यरत असून विविध क्लिष्ट अशा न्यायसहाय्यक (न्यायप्रविष्ठ) केसेस मध्ये पोलिसांव्यतिरिक्त मुख्य तपास अधिकारी म्हणून देखिल सतत कार्यरत आहेत.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close