ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाच्या शैक्षणिक संकुलास कुस्तीसाठी मॅट

आळेफाटा -( दि २४) प्रतिनिधी

  आमदार अतुल बेनके यांच्या फंडातून व आळे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ या शैक्षणिक संकुलास कुस्ती खेळासाठी दहा लाख रूपये किंमतीच्या मॅट देण्यात आल्या आहेत.
आळे परिसरातील कुस्ती या क्रिडा प्रकारास प्रोत्साहन मिळावे व त्यातून दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत यासाठी आमदार अतुल बेनके यांनी दहा लाख रूपये किंमतीच्या मॅट आमदार फंडातून दिल्या होत्या.  सरपंच प्रितम काळे उपसरपंच अँड विजय कु-हाडे यांनी संस्थेचे अध्यक्ष भाऊशेठ कु-हाडे यांचेकडे या मॅट सुपुर्द केल्या यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास सहाणे खजिनदार रोहिदास पाडेकर माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कु-हाडे बबन सहाणे, अर्जुन पाडेकर, संपत गुंजाळ, अरूण हुलवळे ग्रामपंचायत सदस्य मुकुंद भंडलकर, मंगेश कु-हाडे, दिगंबर घोडेकर, बाजीराव लाड लताताई वाव्हळ, मंगलताई तितर, जयश्री डावखर, सविता भुजबळ 
सभासद ग्रामस्थ व शिक्षकवृंद उपस्थित होते.  
या मॅटचा आळे येथील या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असलेल्या ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय व बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कुस्ती सरावासाठी तसेच क्रिडा स्पर्धांचे आयोजनास उपयोग होणार आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close