रासकरवाडीत बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा

पिंपळवंडी -( दि २४) प्रतिनिधी

पिंपळवंडी ( ता जुन्नर) येथील रासकरवाडी शिवारातल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या आहेत ही घटना मंगळवारी ( दि २३) पहाटेच्या सुमारास घडली

याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील शेतकरी नारायण काशिनाथ रासकर यांच्या घरापासून साधारणता पाचशे मीटर अंतरावर शेळ्यांचा गोठा आहे या गोठा बंदिस्त आहे मात्र या घोड्याचा पत्रा एका ठिकाणी खराब होता त्या ठिकाणी असलेल्या रिकाम्या जागेमधुन बिबट्याने त्यांच्या गोठ्यात प्रवेश करुन दोन शेळ्यांवर हल्ला करुन त्यांना ठार केले या घटनेची माहिती मिळताच आळे विभागाचे वनखात्याचे अधिकारी संतोष साळूंके व वनकर्मचारी बी के खर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे या ठिकाणी दररोजच बिबट्याचे दर्शन होत आहे नागरीक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत त्यामुळे या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या वतीने पिंपळवंडी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलभाऊ रासकर यांनी केली असून परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्यामुळे ग्रामस्थांनी काळजी घ्यावी असे आवहान त्यांनी यावेळी केले आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close